शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी ठोकले ग्राम पंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

१३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देमहिलांनी काढला घागर मोर्चा ; लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : दिवाळी सणाच्या तोंडावर मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त गावरकऱ्यांनी ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथे घडली.
माहितीनुसार, तालुका जलस्वराज्य योजनेअंतर्गत सबंधित गावाला पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुद्धा करण्यात आले होते. यात टाकीचे बांंधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची ओरड नागरिकांनी केली होती. यानंतर पाण्याची मोटर पूर्ववत ठिकाणी लावण्यात येऊन पाणी पुरवठा योजना त्यावेळी पूर्ववत सुरु करण्यात आली होती.
दरम्यान मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील महिला पुरुषांसह ग्राम पंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.
मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील नागरिक पिण्यासह वापरण्यासाठी लागणारा पाणी नजीकच्या नदी, तळयांसह शेतातील विहीरीचे पाणी वापरू लागल्याने नागरिकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची ओरड नागरिकांत आहे. शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बंद असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी गावातील संपूर्ण नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात येथील नागरिक भरत वघारे म्हणाले, मागील दोन आठवड्यापासून बंद असलेला पाणीपुरवठा कोणत्या कारणामुळे बंद आहे तसेच कधी पूर्ववत सुरु करण्यात येईल, अशी विचारणा ग्राम पंचायत प्रशासनाला केली असता उडवाउडवीची देण्यात आली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असतानाही नियोजनाच्या अभावामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. ग्रामीण भागात आजही विहीर किंवा बोअरवेल तसेच नदीचे पाणी थेट जलकुंभात आणून तेच गावात वितरित केले जाते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यालाही बाधा पोहचत असते. याबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर पाऊले उचललेली नाहीत. परिणामी नागरिकांना आजही दूषित पाणी प्यावे लागत आहे.

शुद्ध पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र सांगूनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्यामुळेच कोच्ची येथील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
 

टॅग्स :Waterपाणी