शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र तस्करी प्रकरणासाठी तुमसर पोलीस बालाघाटला रवाना

By admin | Updated: August 22, 2016 00:25 IST

शस्त्र तस्करी प्रकरणी बालाघाट येथे दहा जणांना अटक करण्यात आली होती.

पंजाब पोलीस तुमसरात दाखल : तस्करीचे आंतरराज्यीय तारतुमसर : शस्त्र तस्करी प्रकरणी बालाघाट येथे दहा जणांना अटक करण्यात आली होती. यात तुमसर येथील तीन युवकांचा समावेश आहे. अधिक चौकशीकरिता रविवार रोजी तुमसर पोलिसांचे पथक बालाघाट येथे रवाना झाले. पंजाब पोलिसांचे एक पथक तुमसर व बालाघाट येथे येऊन गेल्याचे समजते. आंतरराज्यीय प्रकरण असल्याने पोलीस गोपनीय चौकशी करीत आहेत. शस्त्रे तस्करीचे तार अनेक राज्यांत जुळल्याचे समजते.आठवड्याभरापूर्वी बालाघाट पोलीस व सायबर सेलने सापळा रचून रामपायली पोलीस ठाण्याअंतर्गत भजियादंड येथे शस्त्र तस्करी प्रकरणात १० आरोपींना मुद्देमालासह अटक केली. यात आठ पिस्टल, एक रिवाव्ल्हर, दोन दूचाकी व एक चारचाकीचा समावेश आहे. यात तुमसरच्या तीन युवकांचा समावेश आहे.१० हजारात ही शस्त्र विकली जात होती. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सुरु होता. बालाघाट येथून रामपायली पोलीस ठाण्यांंतर्गत भजियादंड येथे हा नेहमी सौदा व्हायचा अशी माहिती आहे. पंजाब येथून जबलपूर, बालाघाट असा हा शस्त्रे तस्करीचा मार्ग आहे. पंजाब पोलीस तीन दिवसापूर्वी तुमसरात चौकशी करिता येऊन गेले. येथे लॉज व हॉटेलची त्यांनी चौकशी केली. याबाबत मात्र तुमसर पोलीस अनभिज्ञ आहेत.आज,रविवार रोजी तुमसर पोलिस बालाघाट येथे रवाना झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता ते गेले अशी माहिती आहे. मागील दोन वर्षात किती राज्यात या टोळीने शस्त्रे विकली त्याचा तपास बालाघाट पोलीस करीत असल्याचे समजते. तुमसर येथील युवकांचा यात किती भागीदारी आहे, त्यांनी किती शस्त्रे आणली, विकली व कुणाला दिली याचा तपासाची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)तुमसर पोलिसांचे एक पथक बालाघाट येथे चौकशीकरिता रविवारी रवाना झाले. चौकशीकरिता पोलीस पथक पाठविण्यात आले. पंजाब पोलीस तुमसरात आल्याबद्दल माहिती नाही.- राजेंद्र शेट्टे,पोलीस निरीक्षक, तुमसर