शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बायपासअभावी मृत्यूच्या दाढेतून रेंगेपारवासीयांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आहे. नदी काठावरील मार्गाने बस वाहतूक धोक्याचे असल्याने एसटी महामंडळाने बसगाडी बंद केली आहे.

ठळक मुद्देएसटी बस बंद : वैनगंगेचे पात्र वळत आहे गावाच्या दिशेने

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ते सुरक्षित असावेत असा शासनाचा कटाक्ष आहे. परंतु तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथे बायपास रस्त्याअभावी वैनगंगा नदीच्या तीरावरील रस्त्याने मृत्यूच्या दाढेतून वाहतूक सुरु आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेकडे झपाट्याने वळत असून वर्षभरापासून एसटी महामंडळाने बस वाहतूकही बंद केली आहे.तुमसर तालुक्यातील रेंगेपार १३०० लोकवस्तीचे गांव वैनगंगा नदी तीरावरवर वसलेले आहे. या गावाच्या दिशेने वैनगंगेचे पात्र दहा ते बारा वर्षांपासून वाढत आहे. याकरिता शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. धोकादायक घरांसाठी शासनाने भूखंड दिले. अगदी नदी तीराजवळूनच डांबरीकरण रस्ता परसवाडा व त्यापुढे जातो.बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आहे. नदी काठावरील मार्गाने बस वाहतूक धोक्याचे असल्याने एसटी महामंडळाने बसगाडी बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याविषयी अनेक शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिलेली आहेत.बांधकाम विभागाने केले सर्व्हेक्षणतुमसर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे सर्व्हेक्षण केले. बायपास रस्ता बांधकामाकरीता सुमारे सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सदर प्रस्तावाला शासनाची मंजूरी मिळाल्यानंतरच बायपास रस्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दहा वर्षांपासून बायपास रस्त्याची मागणी येथे आहे. अपघातानंतर प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. धोकादायक रस्ते बंद करुन सुरक्षित रस्ते बांधकामाला प्रथम प्राधान्य द्या, असा शासनाचा आदेश असतांना सदर रस्त्याकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. रेंगेपार- परसवाडा बायपास रस्ता बांधकाम करण्याची मागणी जूनी आहे, याकरिता आतापर्यंत आंदोलने करण्यात आली. परंतु शासनाचे कायम येथे दुर्लक्ष दिसत आहे. अप्रिय घटना घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील. केवळ सहा कोटींचा निधी येथे दिला जात नाही, असे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी सांगितले.रेंगेपार येथील बायपास रस्त्याचे सर्व्हेक्षण झाले असून त्यासाठी सहा कोटी निधींची गरज आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर बायपास रस्ता बांधकाम करण्यात येईल.-डी. एल. शुक्ला,उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर

टॅग्स :riverनदी