शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मासळ येथे ट्रॅक्टर उलटून चालक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

देवीदास मारुती कानेकर (५६) रा.मासळ असे मृताचे नाव आहे. तर विजय विनायक मटाले (४०) रा.मासळ असे जखमीचे नाव आहे. शेतीच्या कामानिमित्त विजय मटाले यांचा ट्रॅक्टर घेऊन देवीदास कानेकर घरतोडा येथील शेताकडे जात होते. मासळ गावाच्या बाहेर ट्रॅक्टर जाताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर थेट शेतात जाऊन उलटला. ट्रॅक्टरचे चारही चाके वर झाल्याने देवीदास इंजिनखाली दबला गेला. तर विजय बाहेर फेकला गेला.

ठळक मुद्देचारही चाके वर : मदतीसाठी घेतली गावकऱ्यांनी धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ : भरधाव ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर ट्रॅक्टर मालक गंभीर जखमी झाला. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या मासळ येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरची चारही चाके वर झाली होती. गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले.
देवीदास मारुती कानेकर (५६) रा.मासळ असे मृताचे नाव आहे. तर विजय विनायक मटाले (४०) रा.मासळ असे जखमीचे नाव आहे. शेतीच्या कामानिमित्त विजय मटाले यांचा ट्रॅक्टर घेऊन देवीदास कानेकर घरतोडा येथील शेताकडे जात होते. मासळ गावाच्या बाहेर ट्रॅक्टर जाताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर थेट शेतात जाऊन उलटला. ट्रॅक्टरचे चारही चाके वर झाल्याने देवीदास इंजिनखाली दबला गेला. तर विजय बाहेर फेकला गेला. अपघाताची माहिती होताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. देवीदासचा मृत्यू झाल्याचे पुढे आले तर विजय मटाले याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार शिवाजी कदम यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसंगे करीत आहेत.

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
भरधाव टिप्परने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. सतीश गजानन बाभरे (४५) रा.आमगाव दिघोरी असे मृताचे नाव आहे. तो फुलमोगरा येथील पेट्रोलपंपावर कामावर होता. आमगाव येथून भंडाराकडे जात असताना भिलेवाडा जवळील एका कंपनीसमोर टिप्पर क्रमांक एमएच ४० वाय ८४७७ दुचाकीला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती आमगाव येथे होताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. सतीशच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. कारधा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू