शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती

By admin | Updated: June 8, 2015 01:05 IST

शहराला अगदी लागून १९ कि़मी. अंतरावर नव्याने निर्मित कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती लाभत आहेत.

भंडारा : शहराला अगदी लागून १९ कि़मी. अंतरावर नव्याने निर्मित कोका अभयारण्याला पर्यटकांची पसंती लाभत आहेत.नैसर्गिक सौदर्य व साधनसंपत्तीसह जैवविविधतेने नटलेल्या जंगलात वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होत असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांची पावले कोका अभयारण्याकडे वळत आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागूनच असलेले १०,०१३ हेक्टर वनक्षेत्र शसनाने २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला कोका अभयारण्य असे नाव देण्यात आले. ब्रिटिशकाळात ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून जे जंगल ओळखल्या जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. हे अभयारण्य वन्यजिवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित केले आहे.या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे. या अभयारण्याचा विकास डिसेंबर २०१३ पासुन सुरु झाला असून २५ नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही, त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाकी तयार करण्यात आली आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी ५-७ गाडया सोडण्यात येत असून गावातीलच १२ वी पास मुलांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीचा मार्ग ४६.५ कि.मी चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे. नागपूर-भंडारा हे ६५ कि.मी. अंतर असून भंडाराहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार १९ कि.मी. अंतरावर आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून ३ जिप्सींची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. पर्यटकांना जंगल सफारीकरीता सकाळी ५ ते ९.३० आणि दुपारी ३ ते ६.४५ या कालावधीत जाता येते. अभयारण्याला भेट देण्यासाठी आॅनलाईन बुकिंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर या प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी ५ ते ७ गाडया सोडण्यात येतात. अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमिटीचे २ टेंट आहेत. त्यामध्ये राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आहे. (नगर प्रतिनिधी)