तीन दारु विक्रेत्यांना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:16+5:302021-02-05T08:40:16+5:30

लाखांदूर : तालुक्यात अलिकडे अवैध देशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी राबविलेल्या मोहिमेत तीन दारु विक्रेत्यांना ...

Three liquor dealers were caught red-handed | तीन दारु विक्रेत्यांना रंगेहात पकडले

तीन दारु विक्रेत्यांना रंगेहात पकडले

लाखांदूर : तालुक्यात अलिकडे अवैध देशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी राबविलेल्या मोहिमेत तीन दारु विक्रेत्यांना रंगेहात पकडण्यात आले. दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे.

प्रजासत्ताकदिनी देशी दारुची परवानाधारक दुकाने बंद होती. त्यामुळे काही व्यक्ती अवैधरीत्या देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती लाखांदुरचे ठाणेदार मोहन कोरेट्टी यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनात धाड टाकली असता, मुकेश लांडगे रा.सावरगाव, मनोहर तोंडरे आणि राहुल भोयर रा.लाखांदूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून देशी दारुचे ७३ पव्वे जप्त करण्यात आले. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नायक विलास मातेरे, गोपाल कोसरे, दुर्योधन वकेकार, भगवंत मुंडे यांनी केली.

ड्राय डेच्या दिवशी दारु विकून अधिक पैसा मिळविण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. लाखांदूर तालुक्यात आता अवैध देशी दारुविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

Web Title: Three liquor dealers were caught red-handed