कोलारा येथे तीन घरांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30

लाखनी तालुक्यातील कोलारा येथील एका घराला प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता अचानक तीन घरांना आग लागली. या आगीत घरातील सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले.

Three houses fire at Kolara | कोलारा येथे तीन घरांना आग

कोलारा येथे तीन घरांना आग

ठळक मुद्देएक लाखाचे नुकसान : आगीचे कारण मात्र अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यातील कोलारा येथील एका घराला प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता अचानक तीन घरांना आग लागली. या आगीत घरातील सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले.
लेखराम भोयर, मंदाबाई भोयर, जगदीश भोयर अशी आगीमुळे नुकसान झालेल्यांची नावे आहेत. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता या घरांना आग लागली. या आगीत शेतकरी परिवारातील कुटुंबांचे राहते घर व गोठे जळाले. यात लेखराम भोयर यांचे ४३ हजार ८०० रूपये, मंदाबाई भोयर यांचे ५६ हजार ६५० रूपये आणि जगदीश भोयर यांचे नऊ हजार १०० रूपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी हेमराज मेश्राम यांनी प्रशासनाला सादर केला.परंतु आगीचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. गावकऱ्यांनी आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: Three houses fire at Kolara

टॅग्स :fireआग