शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींचा खर्च गेला पाण्यात

By admin | Updated: September 28, 2015 00:56 IST

ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे

निश्चित मेश्राम  पालोरा (चौ.)ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेचे भूमीपूजन केले होते. बऱ्याच प्रमाणात काम पूर्ण झाले होते. मात्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दोन आवठडयातच ही योजना गुंडाळण्यात आली. मागील पाच वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जलप्राधिकरण योजना भंगारात जमा झाली आहे. सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पवनी तालुक्यातील ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेअंतर्गत मोठे मोठे जलकूंभ तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे याकरिता जवळपास तिन कोटी रुपये खर्चून हि योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत १३ गावाचा समावेश येतो. यात बाम्हणी, पालोरा, सेंद्री, मावळ, कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, मेंढा, पाथरी आदी गावांचा समावेश आहे. यापैकी अनेक गावांमध्ये आजही पाण्याची तिव्र टंचाई आहे. या गावांना मुबलक पाणी मिळावे हे प्रशासनाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत वैनगंगा नदीतून पाणी ब्राम्हणी येथे जलकुंभात जमा करणे व ते पाणी शुध्द करुन सर्व गावांना पाणी पुरवठा करणे हे या योजनेचे उदिष्ट होते. याकरिता वैनगंगा काटेवर असलेले इंटगाव या गावाला लागून नदीच्या काठावर यंत्र सामुगी लावण्यात आली आहे. या यंत्राच्या साहाय्याने वैनगंगा नदीचे पाणी थेट या जलकुंभात जमा केले जात होते ते पाणी शुध्द प्रक्रिया करुन गावात पाणी पुरवठा केला जात होता. योजना पूर्ण होताच मोठया थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. दोन आठवडे ही योजना सुरु होती. मात्र सर्वत्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम झपाटयाने सुरु करण्यात आले होते. मात्र जास्त खर्चामुळे काही दिवसातच कंत्राटदाराकडून काम बंद करण्यात आले. तीन कोटी रुपये खर्चून बाधलेली जलप्राधिकरण योजना धुळखात उभी आहे. हि योजना सुरु करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधिनी धावपळ केली मात्र अजूनपर्यंत कूणालाही यश मिळाले नाही. योजना बेवारस असल्यामुळे अनेकांनी येथील साहित्य लंपास केले आहे. बाम्हणी ते कोंढा या ५ कि.मी. मध्ये टाकलेली पाईप लाईन बेपत्ता झाली आहे. ठिकठिकाणी उभे वाल फक्त जनतेला दिसत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.