शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही तहानलेले ‘गणेशपूर’

By admin | Updated: June 12, 2015 01:24 IST

भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाणी असूनही गाव तहानलेले

ग्रामपंचायतीची उदासीनता : योजनेच्या नावाखाली अनेकांनी धुतले वाहत्या गंगेत हात !भंडारा : भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात आहे. पाणी असूनही गाव तहानलेले असा युक्तीवाद या गावाला तंतोतंत लागू होत आहे. २००७ मध्ये वैनगंगा नदीवर कोरंभी गावात गणेशपूर गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत गणेशपूरमार्फत ही योजना सुरु झाली. वैनगंगेला भरपूर पाणी असूनही गावाला मात्र काळेकुट्ट प्रदूषित पाण्याचा पिण्यासाठी मागील ८-१० वर्षापासून नळाद्वारे पुरवठा केला जातो. पण ही योजना अंमलात आणताना भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे जलशुद्धकरणाचे संयंत्रच बसू शकले नाही. त्यामुळे सरळ प्रदूषित पेयजलाचा पुरवठा गणेशपूर गावाला केला जातो. या संबंधात अनेक ग्रामसभांमध्ये लोकांनी ओरड केली. पण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंतच्या कालखंडात कधीही गावाला शुद्ध जलपुरवठा व्हावा म्हणून तसदी घेतली नाही. अनेकदा शुद्ध जलपुरवठा व्हावा या दृष्टीने जिल्हाधिकारी व कार्यपालन अधिकारी यांच्याकडे लिखीत तक्रारीसुद्धा केल्या. पण या अधिकाऱ्यांनी सुद्धा या तक्रारीची दखल घेतली नाही. जनतेनी आपल्या तक्रारी शुद्ध जलपुरवठा केला जावा या संबंधात जनतेचे प्रतिनिधी आमदार व खासदारांना वारंवार करण्यात आली. पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. २०१५ च्या मे महिन्यात ग्रामसभेत नागरिकांनी आवाज उठवला. त्यावेळेस विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या संबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे असे सांगून सुटका केली. १ मे २०१५ च्या ग्रामसभेत गावासाठी बोअरवेलची व्यवस्था करून गावाला शुद्ध जल पुरवठा करू या दृष्टीने टेंडरिंगची प्रक्रिया करण्यात आली. उन्हाळ्यात गावातील विहिरी कोरड्या पडल्या असताना प्रदूषित जलपुरवठा सुरुच आहे. पाणी ऐवढे प्रदूषित आहे की जनावरे सुद्धा त्या पाण्याला पिऊ शकत नाही. प्रदूषित पाण्यामुळे मागील वर्षी २०१४ मध्ये पावसाळ्यात ५०-६० नागरिकांचे आरोग्य बिघडले. समस्या असूनसुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी, जनतेचे प्रतिनिधी, आमदार व खासदार व जिल्हा परिषद अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. वैनगंगेत नागनदीचे प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पवित्र गंगा अपवित्र व प्रदूषित झाली आहे व नागरिकांना शुद्ध पाण्यापासून जीवन समजले जाते कोणाचेही नाही. कृपया वर्तमानपत्रातील या बातमीमुळे वरिष्ठ मंडळी वा अधिकारी जातीने लक्ष देवून प्रदूषित जलपुरवठा व होणारे गंभीर आरोग्य विषयक समस्यातून गणेशपूरवासीयांची सुटका करतील व शुद्ध जलपुरवठा करून केला जाईल या दृष्टीने उपाययोजना करतील अशी गणेशपूर येथील नागरिकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)