शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणांनी काढली अंधारात रात्र

By admin | Updated: September 13, 2014 01:02 IST

माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेलेले भंडारा येथील तीन तरुण काश्मिरातील जलप्रलयाच्या सावटात अडकले.

भंडारा : माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेलेले भंडारा येथील तीन तरुण काश्मिरातील जलप्रलयाच्या सावटात अडकले. भुस्खलन सुरू झाले, रस्त्यांवर पाणी साचल्याने मार्ग बंद झाले होते. अशा बिकट परिस्थितीत अडकलेल्या भंडारा येथील तिघांनीही स्वत:ला सावरत कुटूंबियांना सुरक्षिततेची माहिती दिली. मात्र काश्मिरातील पुरस्थिती बघून या तिन्ही मित्रांच्या अंगाचा थरकाप उडाला. धर्मशाळेने आमच्यासह अनेकांना तारल्याचा भयावह प्रसंग आणि हृदयाचा थरकाप उडविणारा प्रसंग भोजराज सोनकुसरे यांनी ‘लोकमत’समोर कथन केला.शहरातील विदर्भ हाऊसिंग कॉलोनीतील भोजराज सोनकुसरे हे मित्र विजय बारई रा.मोहाडी व राहुल हटवार रा.सातोना यांच्यासह माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी ३ सप्टेंबरला भंडारा येथून निघाले. तिघेही जम्मू काश्मिरातील कटरा येथे पोहचल्यावर अस्मानी संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. जम्मू-काश्मिर येथे अतिवृष्टी झाली. याचा फटका हजारो नागरिकांना बसला. पावसाच्या सपाट्यात भंडारातील हे तिघेही कटरा येथे सापडले. यावेळी जोरदार अतिवृष्टी सुरू झाल्याने अनेक सखल भागाला पावसाने कवेत घेतले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडींसह रस्त्यांचे भुस्खलन झाल्याने वाहतूक बंद पडली होती.अशा बिकट स्थितीत सोनकुसरे, बारई व हटवार यांनी आश्रयासाठी एका हॉटेलमध्ये गेले. सर्वत्र पूरस्थिती असल्यामुळे अनेकांनी माणुसकीचा परिचय देऊन एकमेकांना मदत केली. मात्र ज्या हॉटेलात आम्ही तिघेही थांबलो होते, त्या हॉटेल मालकाने चांगलेच लुबाडले. भोजनासाठी एका प्लेटसाठी ३०० रूपये तर एक कप चहासाठी २५ रूपये मोजावे लागले. त्यातुलनेत धर्मशाळेत कमी पैशात उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. काश्मिरातील पुरपरिस्थितीमुळे सर्वत्र वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे ४ ते ८ सप्टेंबरला या तिघांनीही हॉटेलातील चार रात्री अंधारात काढाव्या लागल्या होत्या. वीज पुरवठा खंडीत असल्याने मोबाईल बंद पडले होते तर एटीएम मशिनही वीजेअभावी बंद झाल्याने पैसे काढता येत नव्हते. अशास्थितीत जवळचे पैसे संपत आले होते. दरम्यान, त्यांनी एका एसटीडी बुथवरून घरी फोन करून ते सुखरूप असल्याचे सांगितल्याने कुटूंबीयांचा जीव भांड्यात पडला होता. पावसाचा कहर सुरूच असताना दिवसभर हॉटेलच्या बाहेर पडून गावाकडे जाण्यासाठी काही साधन उपलब्ध होईल यादृष्टीने चाचपणी केली. मात्र मार्ग बंद असल्याने ते कटरा येथे अडकून पडले होते. माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी निघालेले हे तिघेही कटरा येथे अडकल्याने पुढील प्रवास होऊ शकला नाही. ही स्थिती त्यांच्यासाठी चांगली झाली. जर तिघेही पुढील प्रवासात असते तर त्यांच्यावर याहीपेक्षा बिकट प्रसंग ओढविला असता. वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेलो मात्र निसर्गाला ते मान्य नसल्याने देवीच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळाली नाही, देवीचे दर्शन होऊ शकले नाही, ही मनात खंत असली तरी तिच्या कृपेनेच या कठिण प्रसंगातून सुखरूप गावाला परतलो असे, भोजराज सोनकुसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)