शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ

By admin | Updated: November 4, 2014 22:35 IST

मागील वर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक

मागील वर्षीच्या तुलनेत घट : जिल्ह्यात ५५०० अर्ज प्राप्तभंडारा : मागील वर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून ५ हजार ४९९ अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच अर्ज प्राप्त झाले असून यंदा भावी शिक्षकांनी टीईटी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदच्या माध्यमातुन पात्रताधारकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील ५ हजार ४९९ भावी शिक्षकांनी अर्ज सादर केले आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३ हजार २४३, सहावी ते आठवीसाठी १ हजार २९३ तर पहिली ते आठवीसाठी ९६३ जणांनी अर्ज सादर केले आहेत. तीन्ही प्रवर्गात भंडारा तालुक्यात १ हजार ४१६, पवनी ६१३, तुमसर ७६२, लाखांदूर ५०३, साकोली ९८०, मोहाडी ३७९ तर लाखनी तालुक्यातून ८४७ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.मागीलवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी भंडारासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीने या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला होता. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. गतवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मागीलवर्षी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाला जाहिर होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र शिक्षक पात्रता परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सुर आहे. शासनाने शिक्षक पदाची भरती न करता पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा बिगुल फुंकला आहे. यंदा गतवर्षीप्रमाणे टीईटी परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० टक्के गुणांची तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांची अट करण्यात आली आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला घेण्यात येणार आहे.मागीलवर्षी टीईटी परीक्षेसाठी केवळ जिल्हास्तरावरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा होती. मात्र, यावर्षी प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात सातही तालुकास्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून ३० आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्हाभरातून टीईटी परिक्षेसाठी ५ हजार ४५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)