दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन, कोरोनाने वाढविली पालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:00 AM2021-02-24T05:00:00+5:302021-02-24T05:00:52+5:30

दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाचे टर्निंग पॉइंट समजले जाते. काेरोनामुळे दोन्ही परीक्षा उशिरा होणार आहेत  भंडारा जिल्ह्यातून इयत्ता दहावीला १८ हजार  तर इयत्ता बारावीला १५ हजाराच्यांवर परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये हीच चिंता पालकांना सतावत आहे.

Tenth-twelfth exam offline, Corona raises parental concerns | दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन, कोरोनाने वाढविली पालकांची चिंता

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन, कोरोनाने वाढविली पालकांची चिंता

Next
ठळक मुद्देसुरक्षितता महत्वाची : पालक म्हणतात, कॅरीअरसह आरोग्य जपणे गरजेचे

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा  :  कोरोनाच्या सावटात इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या.   इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या या निर्णयामुळे पालकांमध्ये थोडीफार का असेना चिंतेचे वातावरण पसरले आहे कॅरियरसोबत आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे, असा सूरही पालकगण व्यक्त करीत आहेत.
दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाचे टर्निंग पॉइंट समजले जाते. काेरोनामुळे दोन्ही परीक्षा उशिरा होणार आहेत  भंडारा जिल्ह्यातून इयत्ता दहावीला १८ हजार  तर इयत्ता बारावीला १५ हजाराच्यांवर परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये हीच चिंता पालकांना सतावत आहे.

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये, याची काळजी शिक्षण मंडळाने अगत्याने घेणे महत्वाचे आहे.
- दिलीप गोन्नाडे, 
 पालक

दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे आव्हानात्मक काम आहे.
-  सुलोचना निखारे, 
 पालक

पाल्यांचे भविष्य सोबतच त्यांच्या आरोग्याची चिंता असणे ही स्वाभाविक बाब आहे. केंद्र असलेल्या ठिकाणी योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे.
- कविता दलाल
 पालक

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

परीक्षा, विद्यार्थी दशेतील अतिशय महत्वाची बाब आहे. पालकंसह पाल्यांच्या मनातील भिती दूर होणे महत्वाचे आहे. त्याबाबत जागृती करावी.
- डॉ. गोपाल व्यास, 
 पालक

पालकांमध्ये  चिंतेचे वातावरण  आहे. येणारी वेळ कशी राहील, हे सांगता येत नाही. कॅरियरसोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपावे लागणार आहे. 
-डॉ.विरेंद्र कुकडे , 
 पालक

ऑनलाइन पेपर नकोच. पाल्याने वर्षभरातीलअभ्यासाचे फलीत व्हायला हवे. कोरोनाची भिती न बाळगता नियमांचे पालन करीत परीक्षा व्हाव्यात.
- वैशाली कटकवार 
पालक

 

Web Title: Tenth-twelfth exam offline, Corona raises parental concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.