शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात आली. दरवर्षी खरेदी झालेला धान ...

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात आली. दरवर्षी खरेदी झालेला धान गोदामात ठेवून तो मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. परंतु यावर्षी भरडाईचे दर वाढून देण्याच्या मुद्यावरून जिल्ह्यातील एकाही मिलर्सने डीओ उचलला नाही. परिणामी गोदामात धान पडून आहे. जिल्ह्यातील धान साठवण गोदामाची क्षमता केवळ आठ लाख क्विंटल आहे. त्यात खासगी सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामांचा समावेश आहे. अपुऱ्या गोदामांची समस्या असताना २ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १८ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली. एकीकडे धानाची उचल नाही आणि दुसरीकडे जिल्ह्यातील ९४ आधारभूत केंद्रांवर खरेदी सुरू आहे. अशा स्थितीत खरेदी झालेला धान उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या १० लाख क्विंटल जिल्ह्यातील विविध आधारभूत खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेला आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस झाला होता. त्याचा फटका काही प्रमाणात बसला. सुदैवाने अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला नाही. अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागले असते.

जिल्ह्यातील २०३ मिलर्सनी पणन महासंघासोबत भरडाईसाठी ॲग्रिमेंट केले आहे. जिल्हा पणन कार्यालयाने ८० हजार क्विंटलचे डीओ तयार केले आहे. परंतु एकाही मिलर्सने अद्याप भरडाईसाठी धान उचलला नाही. शासन आणि मिलर्स यांच्यात सुरू असलेल्या या वादाचा फटका मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने जिल्ह्यातील ९४ आधारभूत केंद्रावरील खरेदी संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. शासनाने या प्रकरणात तात्काळ तोडगा काढून धान भरडाईसाठी पाठविणे गरजेचे झाले आहे.

बॉक्स

२७६ कोटींचे धान चुकारे

जिल्ह्यात ९४ आधारभूत खरेदी केंद्रांवर १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आधारभूत किमतीनुसार या धानाची किंमत ३३५ कोटी ८८ लाख १९ हजार ७३५ रुपये आहे. यापैकी २७६ कोटी ४६ लाख ३७ हजार २३५ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. तर ५९ कोटी ४१ लाख ८२ हजार ४९९ रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात तीन लाख ९५ हजार ४०८ क्विंटल झाली असून सर्वात कमी खरेदी भंडारा तालुक्यात एक लाख २१ हजार २४६ क्विंटल खरेदी झाली आहे.

बॉक्स

गोदामांची समस्या कायमच

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान साठविण्यासाठी गोदामांचा अभाव आहे. येथे खरेदी झालेला धान खासगी, सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामांमध्ये ठेवावा लागतो. या गोदामांची क्षमता केवळ आठ लाख क्विंटल आहे. त्यामुळे खरेदी झालेला धान ठेवण्याचा प्रश्न निर्माण होतो. गोदामांअभावी धान खरेदीची गतीही मंदावते.