शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी मुलांना शाळेत पाठविलेच नाही

By admin | Updated: November 13, 2014 22:56 IST

तालुक्याीतल वांगी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जोपर्यंत शिक्षकांची पूर्तता होणार नाही,

पालकांनी केला निर्धार : वांगी येथील प्रकारसाकोली : तालुक्याीतल वांगी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जोपर्यंत शिक्षकांची पूर्तता होणार नाही, तोपर्यंत शाळेत मुलांना पाठविणार नाही, असा निर्धार वांगीवासीयांनी घेतल्याने पंचायत समितीचे शिक्षण विभाग अडचणीत सापडले आहे. साकोलीपासून पंधरा कि.मी. अंतरावरील वांगी या गावात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. या शाळेत वर्ग १ ते ८ असून या शाळेत १५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर वर्गानुसार या शाळेत एकूण आठ शिक्षक पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. सद्यस्थितीत या शाळेत फक्त चारच शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.या शाळेला तीन पदवीधर शिक्षक व एक उच्चश्रेणी शिक्षक पाहिजे. यासाठी शाळा समिती, सरपंच व गावकऱ्यांनी अनेकदा शिक्षणाधिकारी, खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना लेखी कळविले आहे. दरम्यान या सर्वांनी सामूहीकरित्या निर्णय घेतला. आज विद्यार्थ्यांना शाळेतच पाठविले नाही. नेहमीप्रमाणे शाळा उघडली. ४ शिक्षकही वेळेवर आले, मात्र शाळेत विद्यार्थी आले नाही. याची माहिती तात्काळ शिक्षकांनी पंचायत समितीला कळविली. मात्र पंचायत समितीकडून निर्णय घेण्यात आला नाही. शिक्षण विभागातर्फे विस्तार अधिकारी पडोळे यांना पाठविण्यात आले. यावेळी पडोळे यांनी गावकरी, सरपंच व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र शिक्षकांची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पाल्यांना शाळेत पाठविणार नाही या गावकऱ्यांच्या भूमिकेपुढे प्रशासनही नमले. आज तात्काळ जवळच्याच गावातील शाळेतील शिक्षक पाठविण्यात आले. उर्वरीत ३ शिक्षक उद्या दि. १४ ला पाठवू असे लेखी आश्वासन पडोळे यांनी दिले. ३ शिक्षकांची पूर्तता झाली नाही तर उद्याही शाळा भरणार नाही, यावर गावकरी ठाम आहेत. यावेळी सरपंच गोपाल परतेकी, उपसरपंच मुकेश कापगते, शाळा समितीचे अध्यक्ष वसंता कापगते, प्रकाश डोंगरवार, राजू कापगते, चैतराम दिघोरे, हेमराज हातझाडे, काशीनाथ हातझाडे, गजानन मुर्गे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)