शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

‘महाल’ विक्रीतील दोषींवर कारवाई करा

By admin | Updated: May 20, 2017 00:55 IST

शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या पांडे महालच्या विक्रीबाबत दोषींवर कठोर कारवाई करावी,

ेविविध संघटना एकवटल्या : प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा, ऐतिहासिक वास्तू वाचविण्याची धडपड लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या पांडे महालच्या विक्रीबाबत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पांडे महाल बचाव समितीतर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरातील ऐतिहासिक पांडे महालाचे बांधकाम १७ व्या शतकात झाले आहे. पांडे महाल ही केवळ इमारत नसून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व पालिकेच्या उदासिन धोरणामुळे महालाचे अस्तित्व धोक्यात आहे. पर्यटन क्षेत्रात वाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या बाबतीत उलटेच चित्र आहे. महालाच्या बाबतीत तशीच प्रतिक्रीया उमटत आहे. महाल पुरातत्व विभागाला सोपविण्यात यावे, अशी मागणी स्वातंत्र लढ्यानंतर करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाने याकडे नेहमी दुर्लक्ष केले. ९० च्या दशकात पांडे कुटुंबीयांनी प्रशासनाला प्रस्ताव दिला होता. त्यात महाल शासनाने खरेदी करुन त्याचे रुपांतर वस्तु संग्रहालयात करण्याचे म्हटले होते. पंरतु प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सन २०१० मध्ये पांडे महाल पाडण्याचे षडयंत्र सुरु झाले. नगर पालिका प्रशासनाने या महालाला धोकादायक इमारतींच्या सुचीमध्ये दाखल केले. २०११ मध्ये या महालचा सौदा केला. महाल पाडण्यासाठी जेसीबीसह मजूर आल्यावरही प्रशासनाने त्याची घेतली नाही. तत्कालीन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणात उडी घेवून बांधकाम थांबविले तसेच सदर महाल पुरातत्व विभागाच्या हवाली करण्यात यावे यासाठी धडपड सुरु केली. गोसावी मठाचे जसे बांधकाम झाले तसेच बांधकाम किंवा जिर्णोध्दार पांडे महालाचा करावा अशी मागणी रेटून धरण्यात आली होती. मात्र प्रशासनाने पाठ दाखविली. नाट्यमध्य घडामोडी अंतर्गत नोटीफिकेशनमधून पांडे महालाचे नाव हटविण्यात आले. याचाच अर्थ जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा आरोपही समितीने केला आहे. १२ मे २०१७ रोजी पांडे महालातील काही भाग विक्री करण्याअंतर्गत करारनामा करण्यात आला. यात दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे. राज्यपाल यांच्या नोटीफिकेशनमध्ये असलेल्या पांडे महालचा विक्रीनामा करताना हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष ठेवणे गरजेचे होते. मात्र विक्रीनामा करण्याचा प्रकार भूमाफियांच्या दबावाखाली करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवते. पांडे महालाचे अस्तित्व नेस्तनाभूत करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी तसेच पांडे महालची वास्तु सुरक्षीत ठेवण्यासाठी त्वरित आदेश काढावे अशी मागणी समितीने केली आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे प्रशांत लांजेवार, शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, भाजपचे विकास मदनकर, श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र श्रीवास्तव, विवाह फाऊंडेशनचे अमित मेहर, सचिन बावने, फुटपाथ संघटनेचे अख्तरबेग मिर्झा, देवा कारेमोरे, संजय मते, बालु ठवकर आदी उपस्थित होते. काँग्रेसही आक्रमक लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात पांडे महलाची विक्री रद्द करून महल खरेदीदार व अधिकाऱ्यांना अटक करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शहरातील ऐतिहासिक महल या वास्तुची विक्री तसेच शहराची ऐतिहासीक ओळख मिटवून काढणारी विकृत मानसिकतेचे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्री करून अवघ्या एका तासामध्ये रजिष्ट्री केली. शिष्टमंडळात सचिन घनमारे, अजय गडकरी, विनीत देशपांडे, अखिल तिवाडे, विपुल खोब्रागडे, नितेश कान्हेकर, दिलीप देशमुख, निल दिक्षित, विलास ढेंगे, संदेश शामकुंवर, अयुब पटेल आदी उपस्थित होते.