शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 7, 2016 00:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई (दादर) येथे स्थापन केलेले आंबेडकर भवन काही व्यक्तींनी पाडले. यामुळे सर्वत्र असंतोष पसरला असून ऐतिहासीक भवन

तहसीलदार यांना निवेदन : राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलची मागणीतुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई (दादर) येथे स्थापन केलेले आंबेडकर भवन काही व्यक्तींनी पाडले. यामुळे सर्वत्र असंतोष पसरला असून ऐतिहासीक भवन जमिनदोस्त करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्यासाठी आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. या भवनाशी आंबेडकरी अनुयायांचे भावनीक नाते जुडले आहे. आंबेडकरी समाजासाठी ते भवन एक आदर्श भवन होते. सदर ऐतिहासीक वास्तू मध्यरात्रीच्या सुमारास अनधीकृतरित्या जमीनदोस्त करण्यात आले. या भवनात बुद्ध भूषण प्रिटींग प्रेस होती. यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. या जखमेचा राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणात दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी अरुण गजभिये, तिलक गजभिये, ओम करमकर, संकेत गजभिये, अंकुर ठाकूर, सरोज पाटील, निशिकांत पेठे, अनिल गजभिये, मयुर चवरे, मॉरिस भवसागर, विशाल गजभिये, दीपक प्रधान आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)