शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

राज्यात अनुसूचित जाती - जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून नागपूरसह पुणे जिल्ह्यातील विराज जगताप याचा एका प्रेम प्रकरणावरून जातीयवाद्यांनी हल्ला केला. यासोबतच जळगाव, परभणी जिल्ह्यातील पाच तरुणांवर हल्ला झाला. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुल अडसूळ यांच्यावर गावातील लोकांनी मिळून हल्ला केला होता. जालना जिल्ह्यात एका परिवाराला टोळीने मारहाण केली होती.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीची मागणी : तहसीलदारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : नागपूर जिल्ह्यातील अरविंद बन्सोड या युवकाची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली असून लाखनीचे तहसीलदार मल्लीक विराणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
राज्यात अनुसूचित जाती - जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून नागपूरसह पुणे जिल्ह्यातील विराज जगताप याचा एका प्रेम प्रकरणावरून जातीयवाद्यांनी हल्ला केला. यासोबतच जळगाव, परभणी जिल्ह्यातील पाच तरुणांवर हल्ला झाला. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुल अडसूळ यांच्यावर गावातील लोकांनी मिळून हल्ला केला होता. जालना जिल्ह्यात एका परिवाराला टोळीने मारहाण केली होती. जालना जिल्ह्यातील मनठा येथील शिक्षकाला जातीयवादी शिवीगाळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना घडली होती. परभणी जिल्ह्यातील निळा गावातील महिला सरपंचांना कोरोना काळात क्वारंटाईन केले म्हणून मारहाण केल्याची घटना घडली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील आंतरजातीय प्रेमप्रकरणातून कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. तसेच बीड जिल्ह्यातही समाजातील काही बांधवांनी हल्ला केला होता. अशा राज्यात विविध ठिकाणी अनेक घटना घडल्या असल्याने वाढत्या घटनांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक दीपक जनबंधू, नेहाल कांबळे, मंगेश गेडाम, ओंकार कोवे, पवन गजभिये, अतुल नागदेवे, केशव रामटेके, प्रांजल लांडगे, अलबक्ष खान, सचिन रामटेके आदी उपस्थित होते.

लाखांदूरात भारिप बहुजन महासंघाचे निवेदन
लाखांदूर : भारिप बहुजन महासंघ लाखांदूर तालुका शाखेच्या वतीने अरविंद बन्सोड व विराट जगताप यांच्या खटल्याप्रकरणी सखोल चौकशी करून स्वतंत्र पोलीस निरीक्षकांच्या नेमणुकीसाठी लाखांदूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. राज्यात काही जिल्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. अरविंद बन्सोड व विराट जपताप हे दोन युवक या अत्याचाराचे बळी ठरले आहेत. यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करून जिल्हास्तरावर स्वतंत्र पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी भारिप बहुजन महासंघ लाखांदूरच्या वतीने तहसीलदार संतोष महल्ले यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष युवराज सुखदेवे, उपाध्यक्ष स्वप्नील बन्सोड, आनंदराव लोखंडे, प्रकाश सुखदेवे, गुलजारीलाल बन्सोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Murderखून