शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निलक्रांतीतून ग्रामीण रोजगार निर्मितीला बळ

By admin | Updated: May 24, 2017 00:21 IST

शेतकऱ्यांना भातशेतीसह तलाव, बोड्या यामध्ये पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे.

साकोलीत तलाव ते मासोळी अभियानाचा शुभारंभ : विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकऱ्यांना भातशेतीसह तलाव, बोड्या यामध्ये पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या स्थानिक उच्च प्रतीच्या व आहारात उपयुक्त अशा मासोळीचे उत्पादन वाढवणे आणि त्यातून निलक्रांतीतून ग्रामीण रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केले. साकोली येथील नवजीवन हायस्कुल येथे आयोजित तलाव ते मासोळी कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, गोंदिया कार्यपालन अधिकारी ठाकरे, मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरचे प्रा.शामकांत शेळके आदी उपस्थित होते.यावेळी अनुपकुमार म्हणाले, मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून अन्न साखळीत उत्तम दर्जाचे प्रथिने मिळवून मुलांची कुपोषणातून मुक्तता होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील लोकांना पुरक रोजगार व उपजिविकेचे अतिरिक्त साधन निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात माशांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध आहे. तालाब तेथे तलाव हे क्रांतीकारक अभियान असून ग्रामीणांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणेल. मत्स्यव्यवसायासाठी सॅटेलाईटच्या सहाय्याने तलावाची निवड करून मत्स्यबिज, मत्स्यजीरे, बोटुकलीच्या व मासे उत्पादनात वाढ केली जाणार आहे. यावेळी आमदार काशिवार यांनी विभागात भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात साकोलीला तलाव तेथे मासोळी या अभियानाचा शुभारंभ होणे हे गौरवास्पद आहे. कोळी, ढिवर हा समाज मत्स्यव्यवसाय करतो. हा समाजाला शास्त्रीय पद्धतीने मत्स्यव्यवसाय करण्याचे ज्ञान या तलाव तेथे मासोळी अभियानातून दिले जाईल. या समाजाने व्यसनांपासून दूर राहावे. शासनाची गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार व मत्स्ययुक्त तलाव ही योजना राबवून समाजातील वंचित घटकापर्यंत आर्थिक विकास पोहचवला जाईल. गावतलाव, मामा तलाव ही पूर्वजांची देण गोंदिया, भंडारा जिल्ह्याला मिळाली आहे. अनेक वर्षांपासून गाळ उपसालाच नाही. त्यामुळे खोलीकरण करून पाण्याचे सिंचन केले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात या अभियानातून वाढ होणार आहे. तलाव तेथे मासोळी ही शासनाची योजना न राहता लोकसहभागातून आर्थिक उन्नतीची चळवळ झाली पाहिजे. मत्स्यव्यवसायासाठी पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध करून देऊ. परंतु व्यवसाय करणाऱ्यांनी पैशांचा योग्य विनियोग केला पाहिजे असे मार्गदर्शन केले.आमदार परिणय फुके यांनी शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढविण्याशी मत्स्यव्यवसाय व दुग्ध व्यवसाय हे पुरक व्यवसाय शास्त्रोक्त करण्यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न करू. असे आश्वासन दिले. मच्छीमार सोसायटीचे संजय केवट यांनी मत्स्यव्यवसायीकांच्या समस्या मांडल्या.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अभिषेक नामदास यांनी केले. तर आभार उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.