शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतिणीचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 7, 2014 23:28 IST

लाखांदूर येथील एका महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारला तिची प्रसूती झाली. मात्र उपचार सुरू असतानाच या बाळंतिण मातेचा मंगळवारला पहाटे मृत्यू झाला.

सामान्य रुग्णालयातील प्रकार : संतप्त नातेवाईकांनी दिला पतीला चोपभंडारा : लाखांदूर येथील एका महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारला तिची प्रसूती झाली. मात्र उपचार सुरू असतानाच या बाळंतिण मातेचा मंगळवारला पहाटे मृत्यू झाला. कालपर्यंत व्यवस्थित असताना तिचा अचानक मृत्यू कसा झाला यामुळे वातावरण गंभीर बनले होते.रिना हरीश पिल्लेवान (२३) रा. लाखांदूर असे मृत महिलेचे नाव आहे. रिनाच्या मृत्यूला पती जबाबदार असल्याच्या कारणावरून त्याला रूग्णालय परिसरात संतप्त नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर रिनाचा मृतदेह लाखांदूरला सासरी नेत असताना तिच्या तोंडातून फेस बाहेर निघाला, त्यामुळे तिचा मृतदेह लाखांदूर पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तिथून परत भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथील दिलीप मेश्राम यांची मुलगी रिना हिचा लाखांदूर येथील हरीश जगदीश पिल्लेवान याच्याशी १ जून २०१३ ला विवाह झाला होता. प्रसूतीसाठी तिला लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तिथे तीन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. भंडारा जिल्हा रूग्णालयात शुक्रवाला सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरची मंडळी नाराज होती. त्यानंतर हरीशने रिनाच्या आईवडिलांशी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी प्रसूती वॉर्डातच वाद घातला. प्रसूतीनंतर रिनावर उपचार सुरू होते. तिची प्रकृती चांगली होती. मात्र मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास रिनाची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर रूग्णालय प्रशासनाने तिच्या मृत्यूचे नेमके निदान न करता मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो गाडीत ठेवला.यावेळी वॉर्डातील अन्य रूग्णांच्या नातेवाईकांनी रिनाच्या मृत्यूस पती हरीश जबाबदार असल्याचा आरोप मृतक रिनाचे वडील दिलीप व नातेवाईकांनी केला. दरम्यान, रिनाचा मृतदेह सासरी लाखांदूर येथे नेण्यात आला. मात्र वाटेत मृतकाच्या तोंडातून फेस बाहेर येत असल्याने मृतकाचे वडील व अन्य नातेवाईकांचा संशय बळावला. मृतदेह सासरी न नेता त्यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात नेला. याप्रकरणी सासरकडील मंडळींच्या नावाने गुन्हा नोंदविण्याची मागणी रिनाच्या वडिीाांनी केली. ठाण्यात परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलीस निरीक्षकांनी सतर्कता बाळगून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. (शहर प्रतिनिधी)