शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आग प्रकरणात घातपाताचा संशय

By admin | Updated: April 15, 2016 01:01 IST

लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाला लागलेल्या आगीसंदर्भात घातपाताचा संशय संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून

तुमसर येथील राष्ट्रीय शाळा जळीत प्रकरण : पत्रपरिषदेत पदाधिकाऱ्यांचा आरोपतुमसर : लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाला लागलेल्या आगीसंदर्भात घातपाताचा संशय संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून विद्यमान अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलिसात तक्रार करण्यात आली, अशी माहिती संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली.दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास लोकमान्य टिळक विद्यालयाच्या कार्यालयाला भीषण आग लागली. या अग्नीतांडवात शाळेचे महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले. या संस्थेचे ७ पदाधिकारी व सदस्यांपैकी विद्यमान अध्यक्ष मोरेश्वर निखाडे हे एकटेच एका बाजूने व इतर ६ दुसऱ्या बाजूने आहेत. निखाडे यांनी यापूर्वी केलेले गैरप्रकार, शिक्षक नियुक्त्यांद्वारे आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता उघड होऊ नये, या भीतीपोटी त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला.जळीत प्रकरण घडण्याच्या ४ ते ५ दिवसापूर्वी सायंकाळी ४ ते ५ वाजता मोरेश्वर निखाडे स्वत:चे ट्रॅक्टर चालवित जाऊन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ - ६४१३ शाळेतील फर्निचर संस्थेचे पदाधिकारी अमरबहादूर सिंग, कुशवाह व रामू ढोके यांचे घरासमोरून घेऊन गेले. हे त्यांनी स्वत: पाहिले. याच ट्रॅक्टरमध्ये फर्नीचर सोबतच दस्ताऐवज नेऊन ते गहाळ केल्याचा आरोप लागेल व संशय निर्माण होईल म्हणून ७ एप्रिल रोजी शाळेतील दस्ताऐवज असलेल्या खोल्यांना जाळण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. प्रथम शाळेचे फर्निचर इतरत्र हलविल्यामुळे चोरीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळेचे फर्निचर इतरत्र हलविण्याचा ठराव संस्थेने घेतला नव्हता. मग फर्निचर कसे हलविण्यात आले असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.स्वत:च्या बचावाकरिता नियमित विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाल्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी संस्थेचे उपाध्यक्ष रामू ढोके, कोषाध्यक्ष माणिकराव भुरे, सहसचिव ललीतकुमार थानथराटे, सदस्य अमरबहादूर कुशवाह यांनी केली आहे. या प्रकरणात माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनेचे सदस्य तुमसर बंद करून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. पत्रपरिषदेला संस्थेचे तीन पदाधिकारी व सुभाष पडोळे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)