संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:48+5:30

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली.

Support sugarcane farmers in times of crisis | संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

Next
ठळक मुद्देदुहेरी फायदा : तुळशीविवाहाच्या पर्वात ऊसाची मोठी विक्री

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने धान पीक उध्वस्त झाल्याने हतबल असलेल्या अनेक शेतकऱ्यांना उसाने मोठा आधार दिला. तुळशी विवाहाच्या पर्वात मोठ्या प्रमाणात उसाची विक्री होऊन त्यातून रोख शेतकऱ्यांच्या हाती आले. धानासोबत उसाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली. गत आठवड्याभरात शहरात मोठ्या प्रमाणात ऊस विकून शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेवर मात केली.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली. पुर्वी साखर कारखाना सुरु असल्याने ऊसाला मागणी होती. कारखाना बंद पडल्यानंतर पुन्हा शेतकºयांना धान पिकाशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु अनेक शेतकºयांनी धानपिकासोबत ऊसाची लागवड केली. यंदा परतीचा पावसाने धान पीक उध्वस्त झाले. शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ज्यांनी थोडा थोडगा का असेना ऊस लावला होता, त्यांना तुळशीविवाहाने मोठा हातभार लावला. अनेक शेतकऱ्यांनी भंडारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची विक्री केली. तुळशीविवाहासाठी उसाची खोपडी आवश्यक असते. शहरातील प्रमुख मार्गावर बैलगाडीने ऊस आणून विक्री केली. ८० ते १०० रुपये पाच ऊसाची विक्री केली. रोख पैसे अनेकांच्या हातात आले. यासोबतच जिल्ह्यात तुमसर, साकोली तालुक्यात गुऱ्हाड आहे. या गुऱ्हाडातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी आता धानासोबतच ऊस लागवडीकडे वळत आहे.

कृषी विभागाकडून पुढाकाराची गरज
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान शेती होते. परंतु ही शेती शेतकºयांच्या फायद्याची नाही. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकाचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Support sugarcane farmers in times of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.