शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा

By admin | Updated: November 4, 2014 22:34 IST

सिहोरा परिसरातील सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार

डाळ शिजत नाही : पुरवठाधारकांचा मुजोर कारभार, कारवाई होणार काय?चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याच्या कारणावरून व्यवस्थापन समितीने मध्यान्ह भोजन वाटपातून तूर डाळ बंद केली आहे.ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शासन स्तरावर अनेक कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु या उपक्रमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेली आहेत. सिहोरा परिसरातील सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ७ तुकड्या आहेत. या तुकड्यात १५४ विद्यार्थी आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना नियमित मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येत आहे. परंतु गेल्या महिना भरापासून मध्यान्ह भोजनातून तूर डाळ गायब झाली आहे. शालेय व्यवस्थापन तथा शिक्षकवृंद दोषी नसतानाही त्यांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणून तूर डाळ देण्याची ओरड पालक करीत आहेत. परंतु निकृष्ट तूर डाळ पुरवठा करण्यात आल्याच्या कारणावरून शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ‘टेंशन’मध्ये आलेली आहेत.राज्यात जिल्हा परिषद शाळांना मध्यान्ह भोजनासाठी लागणारा सकस आहाराचा पुरवठा करण्याचे कंत्राट महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटीव्ह कंझुमर्स फेडरेशन लि. मुंबई यांना देण्यात आले आहे. विभागीय कार्यालय नागपुरातील सीताबर्डी परिसरात अपना भंडार नावाने आहे. या कार्यालय अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांना सकस आहार पुरवठा करण्याचे कंत्राट गोंदियाचे आदित्य अग्रवाल नामक इसमांना देण्यात आले आहे. गेल्या २६ सप्टेंबरला सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात तुर डाळ वाटपासाठी देण्यात आली आहे. १ ते ४ तुकड्यासाठी १५ किलो आणि ५ ते ७ तुकड्यासाठी २० किलो अशी एकूण ३५ किलो आहे. ही तूर डाळ तुमसरच्या अग्रवाल नामक इसमामार्फत पुरवठा करण्यात आली आहे. दरम्यान आधी २-३ दिवस मध्यान्ह भोजनात ही तुर डाळ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. भोजनात वरणाची दुर्गंधी येत असल्याने विद्यार्थ्यांनी या संदर्भात शिक्षकांना सांगितले आहे. सदर तुर डाळ शिजत नाही असा प्रकार लक्षात येताच मध्यान्ह भोजनातून ही तूर डाळ वाटप करणे बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी सकस आहारापासून वंचित झाली आहेत. सद्यस्थितीत तूर डाळ शिजविणे बंद करण्यात आले आहे. या डाळीच्या भोजनात उपयोग केल्यास उलट्या तथा आजार पण आल्याचे विद्यार्थ्यांतू लक्षणे दिसत असल्याच्या कारणावरून शालेय व्यवस्थापन समितीने या निकृष्ट तूर डाळीला सिलबंद केली आहे.दरम्यान या संदर्भात तुमसरच्या अग्रवाल नामक इसमाला व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारले असता त्यांनी सांगितले, या तूर डाळीच्या संदर्भात माहिती नसून आपण फक्त पुरवठाधारक आहोत. गोंदियावरून सकस आहार पुरवठा होत असल्याची माहिती दिली. दरम्यान पंचायत समिती तथा जिल्हा परिषद पर्यंत या तूर डाळीची माहिती देण्यात आली असली तरी चौकशी आणि कारवाई शून्य आहे. अद्यापपर्यंत निकृष्ट तूर डाळीची उचल करण्यात आली नाही. तथा नव्याने तूर डाळीचा पुरवठा करण्यात आलेला नसून गोंदिया येथील पुरवठाधारकांचा मुजोर कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. (वार्ताहर)