रविवारी १६ व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:30+5:30

जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. तालुका निहाय कोरोनाबाधीतांच्या रुग्णसंख्येवर नजर घातल्यास भंडारा तालुका अव्वल आहे. भंडारा तालुक्यात रुग्ण संख्या ६९, साकोली ५४, लाखांदूर १८, तुमसर ५१, मोहाडी १८, पवनी ३० तर लाखनी तालुक्यात ३१ रुग्णांची संख्या आहे.

On Sunday, 16 people tested positive | रविवारी १६ व्यक्ती पॉझिटिव्ह

रविवारी १६ व्यक्ती पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे२०७ रुग्ण झाले बरे : आतापर्यंत २७१ व्यक्ती कोरोनाबाधीत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासह तालुका ठिकाणी दररोज कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. शनिवारी पाच रुग्ण आढळल्यानंतर रविवारी तब्बल १६ रुग्ण आढळले. विशेष म्हणजे यात सात रुग्ण भंडारा तालुक्यातील असून तीन तुमसर, साकोली व लाखनी तालुक्यात प्रत्येकी दोन तर पवनी व मोहाडी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे.
तालुका निहाय कोरोनाबाधीतांच्या रुग्णसंख्येवर नजर घातल्यास भंडारा तालुका अव्वल आहे. भंडारा तालुक्यात रुग्ण संख्या ६९, साकोली ५४, लाखांदूर १८, तुमसर ५१, मोहाडी १८, पवनी ३० तर लाखनी तालुक्यात ३१ रुग्णांची संख्या आहे.
भंडारा तालुक्यात आढळलेल्या सात पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी ३४ वर्षीय पुरुष कामठी येथून आलेला आहे. याशिवाय ५५ वर्षीय पुरुष, ६२ व ३२ वर्षीय महिला यांचासह १३ व ११ वर्षाचा मुलाचा समावेश आहे. तसेच ११ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. साकोली तालुक्यातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असून त्यात ४० व ४६ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
मोहाडी तालुक्यात २७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. लाखनी तालुक्यात दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असून अनुक्रमे ३३ व २८ वर्षीय आहे. पवनी तालुक्यात एक ७४ वर्षीय वृध्द पॉझिटिव्ह आहे.
तुमसर तालुक्यात ४१ वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय महिला व दहा वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. हे तिघेही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहे. ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आयसोलेशन वॉर्डात ७८ रुग्ण
रविवारपर्यंत आयसोलेशन वॉर्डात ७८ रुग्ण भरती आहेत. या वॉर्डातून ७४० व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात अ‍ॅण्डीजेन टेस्ट किटद्वारे १४३२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १७ व्यक्ती पॉझिटिव्ह तर १४१५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिव्र श्वासदाहचे १७७ रुग्ण फल्यु ओपीडीमध्ये दाखल आहेत. यापैकी सहा व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह तर १७१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला.

१ लक्ष ११ हजार व्यक्तींजवळ आरोग्य अ‍ॅप
जिल्ह्यात कोरोना संदर्भात जनजागृती व रुग्णांची माहिती उपलब्ध करण्यासंदर्भात उपयोगात येणाऱ्या आरोग्य सेतु अ‍ॅपचे लाभार्थी एक लक्ष ११ हजार ०३७ पर्यंत पोहोचले आहे. यातून या नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंध व जनजागृती अंतर्गत माहिती निर्देशित करण्यात येत आहे.

Web Title: On Sunday, 16 people tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.