शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी हंगाम संकटात, विजेचे संकट लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात  शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे.

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : तापमान वाढताच विजेचे संकट वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने कृषी फिडरवर अत्यावश्यक अर्थात इमर्जन्सी भारनियमन सुरू झाले. परिणामी पुरेशा पाण्याअभावी उन्हाळी हंगाम संकटात सापडला आहे. रात्री वीजपुरवठा होत असल्याने अख्खी रात्र शेतकऱ्यांना जागून काढावी लागत आहे. बुधवारी तर अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाखाली केवळ दोन ते तीन तासच वीज शेतकऱ्यांना मिळते.जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात  शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांना पाणी अधिक लागत आहे. आठ तासाच्या विजेत शक्य तेवढे सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करतो आहे. मात्र नियमित असलेली आठ तास वीज सुद्धा मिळत नाही. अत्यावश्यक भारनियमनामुळे स्थानिक वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही काही चालत नाही. वास्तव परिस्थिती त्यांच्या लक्षात असूनही वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांना काही करता येत नाही. मात्र यात शेतकरी भरडला जात आहे, तेवढेच खरे! शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होत असून सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आहे.

शेतकऱ्यांच्याच माथी भारनियमन का?- राज्यात विजेचे संकट उभे झाल्याचे खुद्द वीज मंत्र्यांनीच सांगितले. तरीही भारनियमन होणार नसल्याची ग्वाही दिली होती; मात्र इमर्जन्सी भारनियमन करीत शेतकऱ्यांना विजेचा झटका दिलेला आहे. भारनियमन केवळ शेतकऱ्यांच्या माथी का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मात्र याबाबत कुणीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री ३ वाजता अत्यावश्यक भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन नियमित नाही. तुटवड्यामुळे एखादवेळेस केले जाऊ शकते. कृषी फिडरच्या वेळापत्रकानुसारच शेतकऱ्यांना वीज मिळत आहे.-मयंक सिंग,  सहायक अभियंता, पालांदूर.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती