शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात पोलीस प्रशासनाविरुद्व रास्ता रोको

By admin | Updated: November 25, 2015 03:10 IST

गुरांची वाहतूक करणाऱ्यांना बजरंग दल व पोलीस प्रशासन चौकशीच्या नावावर अडवणूक करून त्रास देत असल्याच्या

तुमसर : गुरांची वाहतूक करणाऱ्यांना बजरंग दल व पोलीस प्रशासन चौकशीच्या नावावर अडवणूक करून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर हे आंदोलन सुरु होते. यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर आंदोलन मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर करण्यात आले.दर मंगळवारी तुमसर कृषी उत्पन्न बाजारमध्ये म्हशींचा बाजार भरतो. जनावरे येथे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. बाजारानंतर ही जनावरे चारचाकी वाहनाने वाहतूक केली जाते. वाहतुकीदरम्यान बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पोलीस प्रशासन त्यांची अडवणूक करून कारवाई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची व जनावरे विक्री करणाऱ्या दलालांची मोठी कोंडी होत आहे. मागील आठवड्यात अशीच पोलीस कारवाई करण्यात आली होती. ती जनावरे अजूनपर्यंत अडवून ठेवण्यात आली आहे.या कारवाईमुळे गोपालकात तीव्र असंतोष आहे. ही माहिती बाजार समितीचे उपसभापती राजकुमार माटे, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे, खेमराज ठवकर, राजू गायधने यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडली. मंगळवारी सकाळी ८ वाजता शेकडो शेतकरी, दलालांसोबत तुमसर-भंडारा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी मध्यस्थी करून आंदोलकांची भूमिकाशी चर्चा केली. ठाणेदार गवई यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलक शेतकरी व नागरिकांनी तासभरानंतर आंदोलन मागे घेतले. दरम्यान वाहने अडल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच बेहाल झाले. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांची जनावरे खरेदी विक्री केल्यावर त्यांच्याकडे रितसर बाजार समितीचे पत्र, पावती असा दस्ताऐवज असतो. जनावरांची वाहनांतून वाहतूक करण्यात येते. ही जनावरे कत्तलखान्याकडे जात नाही. तरी त्यांची चौकशीच्या नावाखाली अडवणूक केली जाते ती कदापी यापुढे खपवून घेणार नही.- राजकुमार माटेउपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर