शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील दगड प्रकरणात तहसीलदारांनी घेतले बयान

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

सुकळी (देव्हाडी) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि़मी. रस्ता खडीकरणाच्या कामाकरिता वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी दगडांचे ढीग पाडले आहेत. याप्रकरणात नायब

सुकळी येथील प्रकार : खनिकर्म, पंचायत समिती कार्यालय गप्पतुमसर : सुकळी (देव्हाडी) नदीघाट ते सुकळी गावापर्यंत अडीच कि़मी. रस्ता खडीकरणाच्या कामाकरिता वैनगंगा नदीपात्रातील दगडांची उचल करून रस्त्याशेजारी दगडांचे ढीग पाडले आहेत. याप्रकरणात नायब तहसीलदारांसमक्ष तक्रारकर्ते व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले, खनिकर्म विभाग तथा पंचायत समिती कार्यालयाने अजूनपर्यंत याची दखल घेतली नाही.सुकळी देव्हाडी येथे जनसुविधा योजने अंतर्गत जिल्हा परिषदेने सात लाख रूपये मंजूर केले होते. येथे कामे करणारी एजन्सी ग्रामपंचायत आहे. तसा करारनामा सुकळी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी केला आहे. पूरहानी अंतर्गत हा रस्ता तयार करण्याची मंजूरी प्रदान करण्यात आली. येथे प्रत्यक्षात रस्ता बांधकामाला वर्कआॅर्डर मिळाले नाही. तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने रस्ता कामाला सुरूवात केली, अशी माहिती आहे. गावापासून अडीच कि़मी. अंतरावर वैनगंगा नदी वाहते. या नदीपात्रातून दगड गोळा करून ट्रॅक्टरने ते प्रस्तावित रस्त्याच्या कडेला ढीग पाडले आहेत.ग्रामपंचायत सदस्य विकास ठवकर, रवि सार्वे, अनिल बुधे, गीता चौधरी, नलु चौधरीसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांचेकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी क्षिरसागर यांनी या दगडांचा पंचनामा केला. १११ ट्रॅक्टर दगडसाठा प्रस्तावित रस्त्याच्या कडेला आढळला. तसा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला.त्यानंतरसुद्धा कारवाई थंडबस्स्त्यात होती. पुन्हा ग्रामपंचायत सदस्य नायब तहसीलदार अरविंद हिंंगे यांना कारवाई संदर्भात भेटले. नायब तहसीलदारांनी तक्रारकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविल्या. नायब तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या दालनात तक्रारकर्ते विकास ठवकर, रवि सार्वे, ईश्वर चौधरी, सुरेश चौधरी, मोहपत मुळे यांचे तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले. यासर्व कारवाईत जिल्हा खनिकर्म अधिकारी व खंडविकास अधिकाऱ्यांनी मौन पाळल्याचे दिसून येते.तहसीलदारांनी दगड सध्या जप्त केले आहेत. वैनगंगा नदीपात्रातून सऱ्हास दगड गोळा करून ट्रॅक्टरने दगड राजरोसपणे प्रस्तावित रस्ता कामावर टाकण्यात आले. नदीपात्रात ट्रॅक्टरने यंत्राच्या मदतीने खरडणे करून दगड उकरून काढण्यात आले, अशी माहिती आहे. ४० व ८० एमएम दगडांचा येथे समावेश आहे. रस्त्याशेजारी ढीग तयार केला जात असतानी स्थानिक तलाठी व इतर कर्मचारी मूग गिळून गप्प कसे होते. तुमसर मुख्यालयापासून अवघ्या आठ कि़मी. अंतरावर सुकळी हे गाव आहे, हे विशेष.काय आहे नियमनदीच्या नैसर्गिक नदीपात्रातून एक दगड सुद्धा उचलून नेता येत नाही. सुकळी येथील वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड आहेत. दगडांमुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो. पाण्याला दिशा दगडामुळे प्राप्त होते. नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन दगडामुळे होत नाही. यामुळे केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने फायदा केला आहे.रेतीची उचल करताना दगडांची उचल करू नये, असे बंधन आहे. सुकळी ग्रामपंचायतीने नैसर्गिक साधनसंपत्तीची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मोठ्या शिक्षेची तरतुद आहे. यामुळे राजकीय दबावाखाली शासनाने येथे चौकशी व कारवाई टाळल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केली आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास न्यायालयातून दाद मागणार असल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)