शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस हाउसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

बॉक्स प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसचे नियोजन भंडारा आगारातर्फे प्रवाशांच्या मागणीनुसार विविध मार्गांवरील बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच प्रवाशांची मागणी ...

बॉक्स

प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसचे नियोजन

भंडारा आगारातर्फे प्रवाशांच्या मागणीनुसार विविध मार्गांवरील बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी बस वाढविण्यात येणार आहेत. सध्या ग्रामीण भागासह दूर अंतरावरील बसेस सुरू केल्या आहेत.

बॉक्स

निर्जंतुक केलेल्या बस प्रवाशांच्या सेवेत

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही एस.टी. महामंडळातर्फे एस.टी. बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आगारातून बसेस बाहेर काढण्यापूर्वी एस.टी. बसेसचे निर्जंतुकीकरण करून बसेस धावत आहेत.

बॉक्स

तिकीट दर तेवढाच

सातत्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. मात्र बसच्या तिकीट दरात वाढ होईल असे अनेकांना वाटत होते. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे.

कोट

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

कोट

संचारबंदीनंतर बससेवा सुरू झाल्याचा मला मनापासून आनंद झाला आहे. आता एस.टी. बसने प्रवास करता येतो. बसेस सुरू झाल्याने आता कामासाठी जाणे सोयीस्कर झाले आहे.

सागर मेश्राम, प्रवासी

कोट

बस नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून मला गावाकडे जाता आले नाही. मात्र आता एस.टी. बस सुरू झाल्याने गावी जाणार आहे.

- अनिता शेंडे, प्रवासी

कोट

कोरोनामुळे बसेस बंद होत्या. आई आजारी होती, तरीही एकदाच जाणे झाले. मात्र आता एस.टी. बस सुरू झाल्याने चंद्रपूरला जात आहे.

संगीता डोर्ले, महिला प्रवासी

कोट

मास्क असलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश द्यावा. एस.टी.ने प्रत्येक बसचे नियमित सॅनिटायझेशन करावे. प्रवाशांना कोरोना नियमांची सक्ती करावी.

- जयंत केवट, प्रवासी

कोट

एस.टी. बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. भंडारा आगारातून नागपूर, अकोला, वाशिम, राजुरा, परतवाडा, अमरावती, गडचिरोली मार्गांवर एस.टी.सह शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.

- फाल्गुन राखडे, भंडारा आगारप्रमुख.

कोट

बसेसचे नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. संचारबंदीनंतर आता एस.टी. महामंडळाच्या अनेक बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केल्या आहेत. प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांतर्फे कोरोना नियमपालनाचे प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे.

बॉक्स

रेल्वेपेक्षा एस.टी.कडे वाढला कल

भंडारा रेल्वेस्थानक हे शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. त्यातच कोणत्या रेल्वे गाड्या सुरू आहेत, कोणत्या नाहीत याची माहिती नाही. त्या तुलनेत एस.टी. बसस्थानक भंडारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने अनेक प्रवाशांचा एस.टी.कडेच कल वाढला आहे. याशिवाय रेल्वेपेक्षा एस.टी. कर्मचारी यांच्याकडून मिळत असलेली माहिती; तसेच एस.टी. बसमध्ये वृद्ध, विद्यार्थी, अपंगांसाठी असलेल्या विविध योजनांचाही लाभ मिळत असल्याने अनेक जण एस.टी.नेच प्रवास करीत आहेत. त्यामुळे आता एस.टी.चे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.