शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चूनही कालव्याला भगदाड

By admin | Updated: August 25, 2016 00:29 IST

पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी...

पाण्यासाठी शेतकरी त्रस्त : इटियाडोह धरणाचे कालवे बेवारस, निकृष्ट बांधकामाचे परिणामलाखांदूर : पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक अखेरची घटीका मोजत असल्याचे भयावह वास्तव बघायला मिळत आहे. लाखांदूर तालुक्याला इटियाडोह धरण व गोसेखुर्द धरणाची मोठी देणं लाभली आहे. चुलबंद व वैनगंगा नदीची भर पुन्हा तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यास मदत मिळणार म्हणून या भागातील शेतकरी आनंदात होता. अत्याधुनिक शेतीच्या तंत्राची जोड व धरणाच्या पाण्याचा वापर यातून आर्थिक प्रगती साधण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न आता भंगणार आहे. इटियाडोह धरण कालव्याच्या दुरुस्तीकरिता नाबार्ड योजनेअंतर्गत करोडोचा निधी खर्च करण्यात आला. यातील अर्धेअधिक कामे पेटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले. निकृष्ट कामे झाल्याने आता ठिकठिकाणी भगदाड पडले. सिमेंट अस्तरीकरणाची कामे पाण्यात वाहून गेली. धरणाचे पाणी बंद केल्यावर शेवटच्या टोकावर पाणी पोहचते. त्यामुळे पाण्याअभावी धान पिक धोक्यात आले आहे. इटियाडोह धरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे नाले, वाहत आहेत. पाणी वापर संस्था लक्ष देत नसल्याने काही भागातील शेतकरी एक दुसऱ्या कडीला गेट बंद करून पाण्याचा गैरवापर करीत आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी पाणी वापर संस्थाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहेत. त्यामुळे धरणात पाणी असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी बोंबा माराव्या लागत आहेत. अशी परिस्थिती राहिल्यास यावर्षी धान करपल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी) चौरास भागात गोसे धरणाचे कालवे फुटलेचौरास भागात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अर्धवट बांधकाम करण्यात आले. मुख्य कालव्याला लागून लहान कालव्याचे बांधकाम झाले नाही. आधीच निकृष्ट दर्जाचे केलेल्या बांधकामाला भेगा पडलेल्या असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कालव्याना तडे जाऊन कालवे फुटले. तालुक्यातील मांढळ, ओपारा, गुंजेपार, भागडी, पालपेंढारी, गवराळा, किरमटी, नांदेड, विरली या चौरास भागातील कालवे नामशेष होण्याच्या मार्गावर असून संबंधित विभागाने लक्ष न दिल्यास भविष्यात गोसेखुर्द धरणाचे पाणी चौरास भागात मिळणे कठीण जाणार आहे.