उन्हाळी धानाच्या कापणीसह मळणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:11+5:30

तलावाचा व धानाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पावसाळी हंगाम असो वा उन्हाळी हंगाम या दोन्ही हंगामात धान या प्रमुख पिकासह रबी पिके व कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कृषी सिंचन सुविधा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकºयांना विविध पीक उत्पादनासाठी जणू वरदानच ठरले आहे.

Speed threshing with summer grain harvest | उन्हाळी धानाच्या कापणीसह मळणीला वेग

उन्हाळी धानाच्या कापणीसह मळणीला वेग

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धान खरेदी केंद्राअभावी व्यापाऱ्यांची चंगळ

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : पावसाळ्याचे नक्षत्र लागावयास अवघे काही दिवस उरले आहे. उन्हाळी धान पावसात भिजू नये व व्यापाऱ्यांकडून सध्या स्थितीत होणाºया पिळवणुकीत आधारभूत केंद्राअभावी अधिकतम वाढ होऊ नये, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे कधी हॉर्वेस्टर यंत्राने, तर कधी मजुरांकरवी व मळणी यंत्राने उन्हाळी धान पिकाची झट् कापणी पट् मळणी करतांना दिसत आहेत.
तलावाचा व धानाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पावसाळी हंगाम असो वा उन्हाळी हंगाम या दोन्ही हंगामात धान या प्रमुख पिकासह रबी पिके व कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कृषी सिंचन सुविधा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकºयांना विविध पीक उत्पादनासाठी जणू वरदानच ठरले आहे. गोसे धरणाने पावसाळ्यात वरुण राजाने अवकृपा दाखविल्यास प्रसंगी शेतकºयांना शेतीसाठी नवंजीवनी दिली आहे.
निसर्गदत्त व शासन पुरस्कृत सुविधांयुक्त जिल्ह्यात साहजिकच उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र मागील काळात उत्पादनात वाढ होऊनही जिल्ह्यातील प्रमुख धानपिकाला उत्पादन खर्चावर आधारीत मुल्य प्राप्त होत नाही. त्यामुळे काही काळ शेतकऱ्यांवर कर्जबाजारीचे संकट ओढवल्या गेले. कर्जबाजारीच्या संकटाने व नापिकीच्या संकटाने त्रस्त शेतकºयांना कधी माफीचे तर कधी मुक्तीचे शासनाने धोरण राबविले.
या धोरणानुसार कर्जदार शेतकºयांना राज्यांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला गेला असतांना अलिकडच्या शासनाने धानाला आधारभूत समर्थन मुल्य व बोनस देऊन शेतकऱ्यांना जणू ऊबच दिली.
खरीप हंगामात आधारभूत खरेदी केंद्राअंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधी क्विंटल धानाची खरेदी होतांना शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबतांना दिसली. तुरळक प्रमाणात जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही आधारभूत केंद्राअंतर्गत शेतकºयांची नावे पुढे करुन व्यापाऱ्यांच्या धानाची खरेदी झाल्याच्या तक्रारीही ऐकावयास मिळाल्या.
या सबंधी घटनांनी भंडारा जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून चर्चेत आला असला तरी या जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मात्र वेगळीच आहे. खरीप हंगामातील धानपोत्यांनी आधारभूत खरेदी केंद्राअंतर्गत साठवणूक केलेली सर्व गोदामे ऊचल आदेशाविना तुडूंब भरलेली दिसत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींची धान उत्पादक शेतकऱ्यांप्रती उदासिनतेचे द्योतक नव्हे काय? असाही प्रश्न केला जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात थोड्या अधिक प्रमाणात उन्हाळी धानाची सध्यास्थितीत लागवड होऊन धान कापणीला आले आहे. काही भागात कमी अधिक प्रमाणात कापणी व मळणी देखील झाली आहे मात्र उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांकडे धानाची विक्री करतांना दिसत आहेत. व्यापाºयांकडून शेतकऱ्यांच्या या धानाला समर्थन मुल्याहुन कमी जवळपास ५५० रुपये कमी दराने खरेदी केल्या जात आहे.

 

Web Title: Speed threshing with summer grain harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी