शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 28, 2014 23:24 IST

जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी.

पाऊस बेपत्ता : जूनअखेरपर्यंत जिल्हा कोरडाच, शेतकरी हवालदिल
भंडारा : जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी. मात्र पावसाने दडी मारल्याने केलेल्या पऱ्हे मातीत मिसळतात की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे.
गतवर्षी खरिपाच्या हंगामात १३ जूनला झालेला दमदार पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होता. त्यावेळी अतिवृष्टीने तर यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना हैराण केले आहे. वरुणराजाची कृपादृष्टी केव्हा होईल, या आशेने बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
जलसाठा अत्यल्प
राज्यातील धरणांचा जलसाठा अल्प प्रमाणात उरलेला आहे. जलसाठ्याची सरासरी १९ टक्क्यांवर आली आहे. अल्प जलसाठ्यामुळे त्यावर अवलंबून असणारा शेतकरी चिंतेत असून पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या शहराची स्थितीसुद्धा बिकट आहे.
उकाडा कायम
जून महिना संपायला दोन दिवस शिल्लक असले तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. उन्हाची दाहकता कमी झाली नाही. कडक उन्हामुळे उकाडा कायम आहे. जून महिन्यातील या उकाड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
बियाणांची साठवणूक
पाऊस लांबल्यामुळे याचा परिणाम बाजारावर बघावयास मिळत आहे. शेतातील पेरण्या रखडल्यामुळे बियाण्यांची विक्री मंदावली आहे. त्यामुळे याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीच्या शक्यतेने बियाण्यांची व्यापारी वर्गाकडून अधिक साठवणूक होताना दिसत आहे. एकूणच मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांसह नोकरदार सर्वांवर बसत असून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
पाऊस कुठे अडला
सानगडी : यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापुर्वीच वर्तविला होता. मान्सून दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता वाढली आहे. ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होता. मागीलवर्षी वेळेवर दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी जिल्हा कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेतजमिनीची तयार करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवे येण्याची वेळ आली आहे. नागपूर विभागात सर्वधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात केवळ ६४.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात ६९.६४ मि.मी., वर्धा ६०.६६, भंडारा ५४.२९, गोंदिया ८९.६३, चंद्रपूर ४७.०१, गडचिरोली जिल्ह्यात ६३.४३ मि.मी. पाऊस झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)