शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला कलींगड तर कुणाला शिमला मिरची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवर विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहे. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हाची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारासाठी शिमला मिरची, कलींगड, द्राक्षे, अद्रक आदी प्रकारचे गमतीशीर मुक्त चिन्हे आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

ठळक मुद्देअपक्ष उमेदवारासाठी १९७ मुक्त चिन्ह : दुर्बीणपासून ते नारळाची बाग, गालीचा, संगणक, आॅटोचाही समावेश

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवर विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहे. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हाची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारासाठी शिमला मिरची, कलींगड, द्राक्षे, अद्रक आदी प्रकारचे गमतीशीर मुक्त चिन्हे आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक होत असल्याने विधानसभा क्षेत्रासाठी मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी यांच्या सह तृणमुल काँग्रेस असे सात राष्ट्रीय पक्ष आहेत. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष राज्य पातळीवरील पक्ष आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील या सर्व पक्षांना निवडणूक आयोगाने चिन्हे दिली आहे. या पक्षाच्यावतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्या त्या पक्षाचे चिन्ह प्रदान केले जातील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेवून भारत निवडणूक आयोगाने १९७ मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिले आहेत.फुलकोबी द्राक्षांचाही समावेशया मुक्त चिन्हांमध्ये एअर कंडीशनर, कपाट, सफरचंद, आॅटोरिक्षा, बेबी वाकर, बॉक्स, मनुष्य, नाव, बिस्कीट, फळा, दुर्बीन, सायकल पंप, कॅमेरा, कॅन, शिमला मिरची, गालीचा, कॅरमबोर्ड, फुलकोबी, सीसीटीव्ही कॅमेरा, ट्रेन, खाट, संगणक माऊस, कलर ट्रे आणि ब्रश, नारळाचे बाग, कोट, दरवाज्याची घंटी, दरवाजा हॅन्डल, ड्रिल मशीन, डम्बेल्स, कानातील रिंग, लिफाफा, काचेचा पेला, इस्त्री, काडपेटी, पेन स्टॅन्ड, स्टीकर्स, विजेचा खांब, रेझर, बुट, टुथपेस्ट, अक्रोड, झोपाळा, बांगड्या, स्पॅनर पाना, शाळेचे दफ्तर यांच्यासह इतरही चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019