आदिवासी समाजाच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:14+5:30

गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली.

Solve the problems of the tribal community | आदिवासी समाजाच्या समस्या सोडवा

आदिवासी समाजाच्या समस्या सोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी संघटनेची मागणी : विधानसभा अध्यक्षांना भेटले शिष्टमंडळ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : खाजगी व शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता व सुविधांचा अभाव, बावनथडी प्रकल्पग्रस्त गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली.
स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळा, आंबागड येथील एसएससी परीक्षेत ३४ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. त्यांना परीक्षेला बसू देण्यात यावे, सदर शाळा शासनाने बंद केली होती. पुन्हा ती २६ जून २०१९-२० मध्ये दुसºया संस्थेला सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. या शाळेत एकूण ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील सर्व ४२ विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा येथे वर्ग करण्यात यावे. शासकीय आश्रमशाळा, खापा येथे विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी मंजूर केला, परंतु अद्याप कामे पूर्ण झाली नाही. पुनर्वसन गाव सुसुरडोह, कमकासूर नागरिक सुविधापासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील शेतकरी राजीव सागर बावनथडी प्रकल्पापासून बारा गावे वंचित आहेत. पिण्याच्या पाण्यापासून २३ गावे वंचित आहेत. आदिवासी गावात शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आंबागड येथील शाळेची चौकशी करावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात अशोक उईके, अनिल टेकाम, रामकिशन मसराम, दुर्गा परतेती, माणिक मेश्राम यांचा समावेश होता.

Web Title: Solve the problems of the tribal community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.