शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

By admin | Updated: July 1, 2016 00:34 IST

येथील राजेंद्र वॉर्डातील एका सहा वर्षीय चिमुरडीवर घराजवळीलच १६ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

मोहाडी येथील घटना : आरोपी मुलाच्या शोधासाठी चमू रवाना मोहाडी : येथील राजेंद्र वॉर्डातील एका सहा वर्षीय चिमुरडीवर घराजवळीलच १६ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. घटनेनंतर तो युवक फरार झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी त्या युवकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. फरार झाल्यामुळे मोहाडी पोलिसांची चमू त्याचा शोध घेत आहे.येथील राजेंद्र वॉर्डात राहणाऱ्या या मुलीच्या घराला लागुनच आरोपी युवकाचे घर आहे. ही चिमुकली आरोपी युवकाच्या घरी नेहमी खेळायला जात होती. अकराव्या वर्गात शिकणाऱ्या या युवकाने २३ मे ते १५ जून च्या दरम्यान आपल्याच घरी चिमुरडीवर अत्याचार केला. त्यामुळे त्या चिमुकलीला गंभीरस्वरूपात ईजा झाली. याची चिमुकलीच्या आई-वडिलांना कोणतीही शंका आली नाही. परंतु पिडीत चिमुकलीच्या लहान बहीणीने झालेली घटना आईला सांगितली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. मात्र बदनामीच्या भितीने या घटनेची तक्रार पोलिसात केली नाही. आजुबाजुच्या महिलांना ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी चिमुकलीच्या आईला पोलिसात तक्रार देण्यासाठी सांगितले. तक्रार दिली नाहीतर त्या मुलाचे धाडस वाढून तो पुन्हा असे कृत्य करेल, असे सांगितल्याने चिमुकलीच्या आईने बुधवारला मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या मुलीला वैद्यकीय परिक्षणासाठी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले. वैद्यकीय परिक्षण अहवाल व तक्रारीच्या आधारे त्या १६ वर्षीय युवकावर भादंवि ३७६, बाललैगिंक संरक्षण अधिनियम कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती होताच आरोपी युवक हा मोहाडी येथून पसार झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने येथील जनतेत त्या युवकाप्रती रोष असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, जगन्नाथ गिरीपुंजे, मिथुन चांदेवार हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)