साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 05:00 AM2022-05-11T05:00:00+5:302022-05-11T05:00:52+5:30

साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान मंगळवारी पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून लोखंडी राॅड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली.  साकोली तालुक्यातील आमगाव येथील डाॅ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जाण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले.

Six robbers arrested in Sakoli robbery attempt | साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद

साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
साकोली : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर जेरबंद केले. गत दोन ते अडीच महिन्यांपासून दरोड्यासाठी रेकी करत असल्याचे पुढे आले. दरोडेखोरात साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला.
सूरज राम अवतार जयस्वाल (२८) रा. संजयनगर गोविंदपूर, मिलिंद नरेंद्र गजभिये (३७) रा. कस्तुरबा वार्ड गोंदिया हल्ली मुक्काम कामठी जि. नागपूर, रामेश्वर ज्ञानीराम वाढई (३२) रा. इंदिरा गांधी वार्ड कुंभारटोली भंडारा, अरविंद वामन डोंगरवार (४२) रा. घानोड, ता. साकोली, कोमल रमेश बनकर (२६) रा. छोटा गोंदिया अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. अरविंद डोंगरवार हा साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान मंगळवारी पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून लोखंडी राॅड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली.  साकोली तालुक्यातील आमगाव येथील डाॅ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जाण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले. विशेष म्हणजे डाॅक्टर परिवारासह बाहेरगावी असून त्यांची आई एकटी घरी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, ठाणेदार जितेंद्र बाेरकर यांनी केली. आरोपींना साकोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिसांचा अलर्ट आणि रात्रभर जागरण
- सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरवरून एक निनावी फोन आला. त्याने रात्री साकोली तालुक्यात दरोडा पडण्याची शक्यता आहे, असे म्हणून आपला फोन बंद केला. त्यानुसार साकोली तालुक्यातील अलर्ट जारी केला. साकोली शहरावर विशेष नजर ठेवली होती. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनाही आवाहन करून घराबाहेरील लाईट सुरू ठेवा, जगत रहा असे म्हणत पोलिसांनी रात्रभर सायरनचा वाजवत गस्त घालत हाेते. त्यामुळे साकोलीच्या नागरिकांनी रात्र जागून काढली.

 

Web Title: Six robbers arrested in Sakoli robbery attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.