शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, जीव गेल्यावर मजुरी देणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना जर मजुरी मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभागाला मजुरांचा सवाल : भिवखिडकी रोपवाटिकेतील प्रकरण

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : सामाजिक वनीकरण भंडारा परिक्षेत्र पवनी अंतर्गत आधुनिक रोपवाटिका भिवखीडकी येथे विविध योजनेअंतर्गत ठिकठिकाणी रोपांची लागवड व संवर्धन मजुरांमार्फत करण्यात आले. मात्र त्या कामाच्या मोबदला अजुन न मिळाल्याने मजूर संतप्त झाले असून, ‘साहेब, जीव गेल्यावर मजूरी देणार काय? असा सवाल सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारीत आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ, केसलापुरी, कलेवाडा, खैरी, कमकाझरी आणि केसलवाडा या सहा गावातील मजूर व काही ग्रामस्थ आळीपाळीने कामे करतात. त्यात रोपे लावण्यापासून ते त्याचे संवर्धन करणे इत्यादी कामे केली जातात. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना त्या मजुरांना जर मजुरी मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी त्यांना थेट वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा तथा लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी यांच्याकडे निवदेनातून हक्काची मजुरी मिळावी यासाठी याचना करीत असतील तर यापेक्षा शोकांतिका काय असणार ?
भिवखीडकी रोपवाटिकेच्या कमात लाखोंची अफरातफर झाल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकारी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत मजूर राबराब राबले. त्यापैकी तेथील मजुरांना फेब्रुवारी २०१९ पर्यंत मजुरीचे पैसे मिळाले. परंतु मार्च महिन्यापासून अद्याप मजुरी मिळाली नाही. येथील ४० मजूरांनी आपल्या हक्काच्या मजुरी मिळण्यासाठी ९ आॅक्टोबर रोजी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही मजूर वर्गाला न्याय मिळालेला नाही. मजुरांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, अशी स्थिती निफर्माण झाली आहे. तसेच याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळी सारख्या सणालाही हक्काच्या मजुरीचे पैसे द्यावे असे निवेदनात म्हटले होते. मात्र दिवाळी होऊन महिनाभराचा कालावधी लोटला. काहीच झाले नाही. वारंवार लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पवनी शंकर धोटे यांना याविषयी विचारण्यात येते तेव्हा वनविभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण भंडारा यांच्या कडून मजुरीची रक्कम मिळताच आपल्या खात्यात टाकण्यात येईल, अशी उत्तरे मिळत आहेत. ही बाबही मजुरांनी निवेदनात नमूद केली आहे. यासंदर्भात रोपवाटिकेत काम करणाºया मजुरांची मजुरी मिळाली नसल्याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केला असल्याचे पवनी येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे अधिकारी एस. डी. गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभाग