शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा वेतनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख व कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिवाय जिल्हा परिषद, नगरपालिका व अन्य शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १३ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार दर महा १ तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश आहे.

ठळक मुद्देविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ । विविध समस्यांवरही चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षकांना शासन परिपत्रकाप्रमाणे दरमहा १ तारखेला वेतन द्यावे व प्रशिक्षणाशिवाय विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करावी या मागणीला घेवून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख व कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिवाय जिल्हा परिषद, नगरपालिका व अन्य शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १३ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार दर महा १ तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश आहे. मात्र शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरणामुळे वेळेवर वेतन मिळत नाही. तसेच वरिष्ठ, निवड श्रेणी करिता शिक्षक पात्र असूनही शिक्षकांच्या याद्या जाहीर न केल्यामुळे अनेक शिक्षक निवड श्रेणीपासून वंचित आहेत. या विषयावरही शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यात पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करून प्रशिक्षणाशिवाय विना अट निवड श्रेणी लागू करण्याचे मान्य करण्यात आले. मुख्याध्यापकाचे अधिकार सहा महिन्यांकरिता देण्यात येवून पद मंजूर असलेल्या शाळेत मुख्याध्यापकांचे पद पदोन्नतीने भरण्यात यावे, आदी विषयांवरही सकारात्मक चर्चा करण्यात यावी. या आंदोलनात खाजगी प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने पाठिंबा दर्शविला होता. यावेळी चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, दारासिंग चव्हाण, धनवीर कानेकर, धीरज बांते, मनोज अंबादे, भाऊराव वंजारी, पुरूषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, अनिल कापटे, माधुरी मस्के आदी उपस्थित होते.संघटनांचा पाठिंबाशिक्षकांच्या समस्यांबाबत शासन प्रशासन उदासीन आहे. वारंवार आंदोलने करूनही समस्या सुटलेल्या नाही. परिणामी शिक्षकांच्या संघटनांनीही एकीचे बळ दाखविण्यासाठी संघटनेच्या निर्णयांना पाठिंबा दर्शविल्याचे दिसून येते.

टॅग्स :Teacherशिक्षक