शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता साठवणे जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: June 9, 2015 00:47 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित ..

निकालात मुलींनी मारली बाजी, लाखनी तालुका आघाडीवर मोहाडी तालुका पिछाडीवरभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. जिल्ह्याचा निकाल ८२.७२ टक्के लागला असून नागपूर विभागात हा निकाल शेवटच्या स्थानावर आहे. बारावीचा निकालात अव्वलस्थानी असताना दहावीचा निकाल माघारल्यामुळे शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची श्वेता अरविंद साठवणे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून पहिली आली आहे. तिला ९६.६० टक्के गुण मिळाले आहेत. लाखनी येथील समर्थ विद्यालयाची त्रिवेणी बिसेन ही द्वितीय ९५.८० टक्के, समर्थ विद्यालयाचा धीरज बोपचे ९५.४० टक्के, भंडारा येथील महिला समाज विद्यालयाचा निखिल गोटेफोडे याला ९५.४० टक्के गुण मिळाले आहेत.निकालात मुलींची सरशीयावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. यात १०,२२६ मुले आणि १०,२८३ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यात ८,१२९ मुले तर ८,८३७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची टक्केवारी ८५.९४ तर मुलांची टक्केवारी ७९.४९ इतकी असून त्यात मुली ६.४५ टक्क्यांनी समोर आहेत. लाखनी तालुका अव्वलस्थानीलाखनी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८८.८८ टक्के इतका आहे. या तालुक्यात २५ शाळेतून १,७५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ८०९ मुले व ७४९ मुली असे एकूण १,५५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. साकोली तालुक्याचा निकाल ८४.४९ टक्के आहे. ४२ शाळेतून २,८०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,१८० मुले तर १,१८९ मुली असे एकूण २,३६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल ७९.८८ टक्के आहे. ३६ शाळेतून २,१५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ७७१ मुले तर ९४८ मुली असे एकूण १,७१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्याचा निकाल ८४.७६ टक्के आहे. ५७ शाळेतून ४,४५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,९८७ मुले तर २,०४५ मुली असे एकूण ४,०३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पवनी तालुक्याचा निकाल ८३.३३ टक्के आहे. ४० शाळेतून २,७३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,०६० मुले तर १,२२० मुली असे एकूण २,२८० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तुमसर तालुक्याचा निकाल ७९.७७ टक्के आहे. ५३ शाळेतून ३,६९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,४०३ मुले तर १,५४३ मुली असे एकूण २,९४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल ७८.८८ टक्के आहे. ३३ शाळेतून २,६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९१९ मुले तर १,१४३ मुली असे एकूण २,०६२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.