शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शटल रेल्वेचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: October 3, 2015 00:33 IST

भंडारा शहर रेल्वे स्टेशन व भंडारा रोड भंडारा शटल ट्रेन सुरु करण्यात यावी, या मागणीचा रेल्वे यात्री सेवा समितीने सातत्याने पाठपुरावा केला.

पाठपुरावा थांबला : रेलयात्री सेवा समितीचा 'एकला चलो रे'भंडारा : भंडारा शहर रेल्वे स्टेशन व भंडारा रोड भंडारा शटल ट्रेन सुरु करण्यात यावी, या मागणीचा रेल्वे यात्री सेवा समितीने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शटल रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे धूळ खात पडला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या काळात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्वत: प्रफुल पटेल व रेल यात्री समितीचे पदाधिकारी यांच्या बैठकीत अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी प्रफुल पटेल यांनी भंडारा-भंडारा रोड शटल ट्रेन सुरु करणे, रेल्वे पोलीस चौकी स्थापन करणे आदी मागण्याच्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार भंडारा शहर रेल्वे स्टेशन व शटल ट्रेन सुरु करण्यासंबंधी मोठ्या हालचाली झाल्या. इतकेच नाही तर शटल ट्रेन सुरु करण्यासंबंधी मोठ्या हालचाली झाल्या. इतकेच नाही तर शटल ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्याचेही समितीला कळविण्यात आले. पटेल यांच्या प्रयत्नातून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पोलीस चौकी स्थापन झाली. गीतांजली, आझाद हिंद एक्स्प्रेस या गाड्यांचे थांबे मिळाले. शटल ट्रेनसाठी तीन वेळा तांत्रिक तपासणी झाली. समितीला नुकतेच एक पत्र रेल्वेकडून मिळाले असून भंडारा शटल ट्रेनसाठी लाईन सुरु करण्यासाठी अनुमानित २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले. व त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाकडे १९ कोटी १५ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु बोर्डाने तो मान्य केला नसल्याचे दुसरे पत्र रेलयात्री सेवा समितीला पाठविण्यात आले आहे. पुढील महिन्यात नागपूर येथे रेलवे बोर्डाचे अधिकारी, मंत्री व खासदारांची कमेटी यांची रेल्वेसंबंधी बैठक होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांना खासदार प्रफुल पटेल व लोकसभेचे खासदार नाना पटोले यांनी वाचा फोडावी, अशी अपेक्षा रेल्वेयात्री सेवा समितीने केली आहे. (शहर प्रतिनिधी)