शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शोरूम, दुकानांची पार्किंग रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

निम्मा रस्ता पार्किंगसाठी वापरला जात असल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असून सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. वाहतूक शाखेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील मुख्य मार्गालगत, बाजारपेठेत आणि साई मंदिर मार्गावर कपड्यासह इतर वस्तूंचे शोरूम आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठेत वाहतुकीची कोंडी : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, शोरूम मालकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर दिल्या जात आहेत. मुख्य मार्गालगतच्या सोबतच बाजारपेठेतील अनेक दुकाने, शोरूममध्ये ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. मात्र ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधाच उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत.निम्मा रस्ता पार्किंगसाठी वापरला जात असल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असून सार्वजनिक व्यवस्थेवर ताण पडत आहे. वाहतूक शाखेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील मुख्य मार्गालगत, बाजारपेठेत आणि साई मंदिर मार्गावर कपड्यासह इतर वस्तूंचे शोरूम आहेत. मात्र, शोरूममालकांनी खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांना पार्किंगसाठी कुठलीही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी शोरूममालकांनी पार्किंगच्या जागेतही विविध साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून सर्रास रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने दिवसभर बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्यासह निम्मा प्रमुख मार्ग पार्किंगने व्यापलेला दिसून येतो. साईमंदिर मार्ग पूर्वीच अरुंद आहे. या मार्गालगतच्या एकाही व्यावसायिकाने ग्राहकांच्या वाहनाकरिता पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यातच चारचाकी वाहन आल्यास वाहतूक व्यवस्था तासन्तास कोलमडते.दुचाकी वाहनधारक वैताग व्यक्त करताना दिसतात. याशिवाय प्रमुख मार्गावर दुतर्फा चारचाकी वाहने दिवसा आणि सायंकाळनंतर तासन्तास उभी असतात. मात्र, कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांना दिसत नाही. दिवाळी सणामुळे होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.अतिक्रमणामुळे दररोज कोलमडते वाहतूकसाईमंदिर मार्गावर अनेक ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. तर बाजारपेठेत अनेकांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत विविध साहित्य थाटून अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्यास हातभार लागत आहे. वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवून वाहनधारकांसह संबंधित शोरूम, दुकानमालकावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.अतिक्रमणाकडे पालिकेची डोळेझाकबाजारपेठेसह प्रमुख मार्गालगत अनेकांनी विविध प्रकारे अतिक्रमण केले असताना नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखविले जात नाही. दुसरीकडे लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण करताना ते तातडीने काढले जाते. अतिक्रमण काढण्यात नगरपालिकेकडून पक्षपात करण्यात येत असल्याने नागरिकांत असंतोष आहे.

टॅग्स :Parkingपार्किंग