शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भाजीपाला पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : पूरग्रस्तांच्या शासकीय मदतीत बागायतदारांचा समावेश नसल्याने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महापुरात बागायती शेती उद्ध्वस्त झाल्यानंतरही शासकीय मदतीत बागायतदार शेतकऱ्यांचा उल्लेख नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क भाजीपाल्याच्या पिकांवर नांगर फिरविण्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील तामसवाडी, पांजरासह इतर गावात घडला.शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली. परंतु त्यात बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कोणताही उल्लेख नाही. तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु आता शासनाकडून मदतच मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर फिरविला आहे.शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. या शेतकºयांना मदत मिळाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.तामसवाडी, पांजरातुमसर तालुक्यातील तामसवाडी, पांजरा येथील शेतकरी रवी शिंदे, नामदेव शिंदे, परमानंद भांडारकर, नरेश इटवार, रामकृष्ण पांडे, जयंत इखार, देवदास ठाकरे या शेतकऱ्यांनी आपल्या बागायती शेतीत नांगरटी केली. शासनाकडून मदतच मिळणार नसली तर काय करायचे असा प्रश्न या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. शेतकरी या प्रकाराने संतप्त आहेत.

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्या