शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

धक्कादायक! ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्याचा मृतदेह आढळला रुग्णालयाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 3:29 PM

corona Bhandara News ऑक्सिजनची पातळी खालावल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देजांब येथील इसमभंडारा जिल्हा रुग्णालयाबाहेरील प्रकारनातेवाईक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्सिजनची पातळी खालावल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सदर तरूण जांब येथील असून गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.बंडू मरकाम (४२) रा. जांब ता. मोहाडी असे मृताचे नाव आहे. बुधवारी  जांब येथे आरोग्य पथक तपासणी करीत होते. त्यावेळी बंडूची प्रकृती बरी नसल्याचे पुढे आले. त्यामुळे त्याला जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जाण्यास सांगितले. त्यावरून बंडू आरोग्य केंद्रात गेला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याची ऑक्सिजन पातळी ३५ टक्के आढळून आली. त्यामुळे त्याला बुधवारी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत एक कर्मचारी त्याच्यासोबत पाठविण्यात आला.

भंडारा येथे त्याची अन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आरोग्य केंद्राचा कर्मचारी सोबत होता. दरम्यान गुरूवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाबाहेर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या खिश्यात चिठ्ठी आढळली. त्यावरून त्याची ओळख पटली. तसेच त्याचा कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आढळून आला. यावेळी त्याच्यासोबत कुणीही नातेवाईक नव्हते. पोलिसांनी मृत्यूनंतर पुन्हा कोरोना टेस्ट केली असता तो निगेटिव्ह आढळून या घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली.  दरम्यान बंडूच्या पत्नीने आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणानेच आपल्या पतीचा मृत्यू झाला असून या प्रकाराला जबाबदार असणाºया डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याच्यासोबत कुणीही नातेवाईक नव्हते. फ्ल्यू वॉडार्तून आयसोलेशन वॉर्डात जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात.-डॉ. प्रशांत उईके,जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.सदर रुग्णाला भंडारा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. भंडारा येथे पाठविताना त्याच्या पत्नीला सूचना देण्यात आली. प्रतीक्षा करूनही ती आली नाही. उशिर होत असल्याने आरोग्य केंद्राचा एक कर्मचारी सोबत देवून रुग्णवाहिकेने त्याला भंडारा येथे रवाना करण्यात आला. त्याला दाखल करेपर्यंत सदर कर्मचारी सोबत होता. नंतर तो औषधी घेण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात गेला.-डॉ. एस.एम. बोरकुटे, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, जांब.सदर प्रकरणी काही व्यक्ती तक्रार घेवून आंधळगाव पोलीस ठाण्यात आले होते. परंतु याप्रकरणात भंडारा येथे मर्ग दाखल करून चौकशी सुरू होती. तसे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.-दीपक वानखेडे,ठाणेदार, आंधळगाव.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस