शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

वैजेश्वर घाटात शिवभक्तांचा मेळावा

By admin | Updated: July 27, 2014 23:35 IST

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ही बालकवींची कविता श्रावण मास प्रारंभ होताच मुखी येते. बालकवींची ही कविता तंतोतंत लागू पडते.

पवनी : श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ही बालकवींची कविता श्रावण मास प्रारंभ होताच मुखी येते. बालकवींची ही कविता तंतोतंत लागू पडते. नयनरम्य हिरवे गार शालूने नटलेल्या वसुंधरेला पाहून मन प्रसन्न होऊन जाते. अशातच या श्रावणमासात भोळ्या शंकरांची मनोभावे पूजा केली जाते. पवनी तालुक्यात विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या घाट परिसरातील वैजेश्वर घाटात श्रावण मासानिमित्त शिवभक्तांची मांदियाळी पहायला मिळणार आहे.चातुर्मासातील चार महिन्यांपैकी श्रावण महिना सर्वाधिक श्रेष्ठ मानला गेला आहे. पौराणिक ग्रंथातही श्रावण मासाची मोठी महिमा सांगण्यात आली आहे. कारण या महिन्यात जवळजवळ सर्वच दिवस विविध व्रतवैकल्यांनी गजबजलेले असतात. जीवतीच्या अमावस्येनंतर येणारा पहिला सोमवार हा श्रावणमास म्हणून गणला जातो. कधीकधी श्रावण सोमवार चार वेळा तर कधी कधी पाच वेळा येतो. तिथीनुसार यात बदल होत असतात. श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारच्या तत्पूर्वी रविवारी जागृती करण्यात येते. यात मौन धारण करून स्नान केल्यावर सूर्याची पूजा करण्यात येते. तसेच आदित्य राणूबाईची गोष्ट श्रवण केली जाते. सोमवारी उपवास करून महादेवाचा अभिषेक करून शिवामृत अर्पण केली जाते. त्याचप्रमाणे गायत्री महामंत्राचा जाप करून नवनाथ भक्तविजय, शिवलिलामृत, पुराणग्रंथ, गुरुचरित्र, गुरुलिलामृत, साई सत्यवेध, गजानन विजय तसेच संत चरित्रांचे ग्रंथ वाचन केले जाते. नित्य नियमाने भोळ्या शंकराला प्रदक्षिणा घालून बेलपत्र, तुळसपान अर्पण केले जाते.विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी नगरीत प्रत्येक मंदिरात शिवलिंग स्थापित आहेत. सर्व मंदिर १६ व्या शतकातील असावेत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वैजेश्वर हे पवनीतील शंकराचे सर्वात जुने मंदिर आहे. ऋषीपंचमी, महाशिवरात्री व श्रावणमासात मोठ्या संख्येने येथे भाविक येत असतात. मंदिराच्या प्रमुख वैशिष्टांमध्ये बेलाचे पान वैजेश्वर घाटावर विशिष्ट ठिकाणी अर्पण केले जाते. या घाटातील मंदिरात एकाच रांगेत १२ शिवलिंग स्थापित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे श्रावण मासात या मंदिराचे महत्व अजूनच वाढलेले आह. उद्या श्रावणमासाचा पहिला सोमवार असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)