शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी’च्या विधी महाविद्यालयाचे सात विद्यार्थी न्यायाधीश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

न्यायाधीशपदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे नावे अशी - महेश पदवाड, स्मिता उके, गौरव तराळ, निकिता पाचडे, सुप्रिया देशमुख, दीपिका उपाध्याय व नरेश उताणे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे न्यायाधीश पदासाठीचे एमपीएससी कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरचे संचालक राजेश पाटील हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील एकाच वेळी सात विद्यार्थी न्यायाधीशपदी निवडले गेले आहेत. एमपीएससीमार्फत घेतली जाणारी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेसाठीचे सर्व टप्पे उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
न्यायाधीशपदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे नावे अशी - महेश पदवाड, स्मिता उके, गौरव तराळ, निकिता पाचडे, सुप्रिया देशमुख, दीपिका उपाध्याय व नरेश उताणे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे न्यायाधीश पदासाठीचे एमपीएससी कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरचे संचालक राजेश पाटील हे आहेत. राजेश पाटील यांनी त्यांच्याकडून पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशी तीन टप्प्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली. यंदा या परीक्षेला डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या एमपीएससी कोचिंग सेंटरवरून १८ विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेसाठी नोंद केली होती. यामधून १४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. नऊ विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. यापैकी सात जणांनी मुलाखत यशस्वी करून अंतिम यादीत स्थान पटकावले.
प्रभारी प्राचार्य प्रणय मालवीय प्राध्यापक वृंद व संस्था संचालक, कर्मचारी यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

राजेश पाटील यांचे प्रयत्न फळाला
एकाच महाविद्यालयातून एका वेळी सात न्यायाधीश राज्याला मिळणे ही अमरावती जिल्ह्यासाठी बहुमानाची बाब ठरली आहे. २०१० साली न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले; पण तरीही न्यायाधीश घडविण्यासाठी कार्यरत असलेले प्राध्यापक राजेश पाटील यांच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांनी महाविद्यालयाला हे यश संपादन करता आले.

टॅग्स :Studentविद्यार्थी