शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पोलिसांसह सात जणांना अटक

By admin | Updated: April 30, 2017 00:21 IST

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस असतात. मात्र पोलिसच गुन्ह्यात सहभागी असतील तर जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची?

जामिनावर सुटका : भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची साकोलीत कारवार्र्र्र्साकोली : गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस असतात. मात्र पोलिसच गुन्ह्यात सहभागी असतील तर जनतेने न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? असाच एक प्रकार साकोलीत उघडकीस आला आहे. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने साकोलीत क्रिकेटच्या जुगारावर धाड घालून एका पोलीस शिपायासह सात जणांना ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाने या आठही जणांना जामीन दिला असला तरी या प्रकरणाची परिसरात चर्चा आहे. साकोली येथे क्रिकेटच्या जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेशन विभाग भंडारा यांनी सेंदुरवाफा येथे धाड मारली. यावेळी साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सखाराम बोरकर (३२), ओमप्रकाश इस्तारी धुर्वे (२२), पंकज हेमराज मुंगुलमारे तिघेही रा. सेंदुरवाफा, कमलेस दिनदयाल परशुरामकर (१९) रा. घाटबोरी, मंगेश नागदेव ढेंगरी (२३), प्रणीत बलराज नंदेश्वर (२१), रोहीत लल्लन गुप्ता (२४) तिघेही रा. साकोली यांना आयपीएलचे प्रक्षेपण सामन्यावेळी खेळ सुरु असतांना भ्रमणध्वनीद्वारे लोकाकडून पैसे घेऊन क्रिकेटवर जुगार खेळत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचेकडून दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण चार लाख ३० हजार रूपयांचे साहित्य जप्त केले आहे. या आठही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)