शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्कापुरात सिमेंट प्लग बंधाऱ्याचे अर्धवट बांधकाम

By admin | Updated: April 23, 2015 00:15 IST

शेतकऱ्यांना सिंचनाचा सोयीसाठी कर्कापुरात गेल्या वर्षापासून सिमेंट प्लग बंधाऱ्याचे बांधकाम होत असताना,

‘त्या’ कंत्राटदाराचा पोबारा : बंधाऱ्याचे निकृष्ठ बांधकामचुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांना सिंचनाचा सोयीसाठी कर्कापुरात गेल्या वर्षापासून सिमेंट प्लग बंधाऱ्याचे बांधकाम होत असताना, आज घडीला पुर्ण झाले नाही. बांधकाम बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार असून चौकशी तथा कारवाईची मागणी होत आहे.लघु पाटबंधारे विभाग राज्य अंतर्गत कर्कापुर गावात ५४ लाख खर्चाचा सिमेंट प्लग बंधारा सन २०१४ मध्ये मंजुर करण्यात आलेला आहे. या बंधारा बांधकामाचे कंत्राट गोंदिया जिल्हयातील कृणाल रामटेके नामक इसमांना देण्यात आले आहे. महत्वाकांक्षी बंधारा बांधकामास मंजुरी देताना गट नं. १४२/१ या जागेचा आधार घेण्यात आलेला आहे. पंरतु प्रत्यक्षात बंधाऱ्याचे बांधकाम गट नं. १४२/२ मध्ये करण्यात येत आहे. या गटात जनजिवनराम मिश्रा यांची शेती आहे. नियमबाहय या शेतीत बंधाऱ्याचे बांधकाम होत असल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे. गेल्या वर्षापासून या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे.परंतु आजवर बांधकाम पुर्ण झाला नाही. या शिवाय बंधारा बांधकामात शेत जमीन गिळंकृत झाली असताना अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्याने संबंधीत विभागात अनेक निवेदन दिली आहेत. परंतु या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. कुणी वरिष्ठ अधिकारी मदतीकरिता माहिती देत नाही.या विभागाचे उपविभागीय कार्यालय तुमसरात आहे. या कार्यालयात शेतकऱ्याचे गाऱ्हाणे तथा अडचणी निकाली काढणारे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नाही. दरम्यान बंधारा बांधकामाने तिन शाखा अभियंता अनुभवली आहेत. हे अभियंता एकमेकांकडे फक्त बोट दाखवित आहेत. या परिसरात होणारे बंधाऱ्याचे बांधकाम गोंदिया जिल्हयातील कंत्राटदारांना देण्यात आली आहे. राज्यस्तरीय लघु पाटबंधारे विभागाचा कार्यालय गोंदिया जिल्हयातील कंत्राटदारांना लॉटरीची भुमिका बजावत आहे. दरम्यान बंधारा बांधकामात आलबेल असल्याचा कारणावरुन शाखा अभियंता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. बंधारा बांधकामात मोठी तफावत आहे. लोखंड आणि गिट्टी, सिमेंट चा अल्प प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. बंधाऱ्याचे लोखंडी सलाख सैरबैर आहे. तर गिट्टी पूर्णत: निघाली आहे. शेत शिवारात या बंधारामुळे पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. या विभागाचे शाखा अभियंता एम. आर. गजबे यांना अधिक माहितीसाठी संपर्क साधले असता होवू शकला नाही. (वार्ताहर)बंधारा बांधकामात गैरव्यवहार करण्यात आला असून निकृष्ट बांधकामामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. दोषी कंत्राटदार आणि शाखा अभियंता यांचेवर कारवाई करिता आपण रास्ता रोकों आंदोलन करणार आहोत.- सुकलाल सिंदपुरे सरपंच कर्कापुर