जिल्ह्यातील ५८७५ व्यक्तींच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:42+5:30

भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वाेतोपरी प्रयत्न केले जात आहे. विविध उपाययोजनांसह परदेशातून आणि महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ जण परदेशातून आले आहेत. तर मुंबई, पुणे व इतर महानगरातून १ ते २८ मार्चपर्यंत पाच हजार ८४४ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. विदेशातून आलेल्या ३१ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

The seal of separation on the hands of 5875 persons of the district | जिल्ह्यातील ५८७५ व्यक्तींच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का

जिल्ह्यातील ५८७५ व्यक्तींच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का

Next
ठळक मुद्देपाच जणांना सुटी । १२ व्यक्ती हॉस्पिटल क्वॉरंटाईन तर दोनजण आयसोलेशनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विदेशातून आणि महानगरातून जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रशासनाची करडी नजर असून आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ८७५ व्यक्तींच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारण्यात आले आहे. त्यात परदेशातून आलेल्या ३१ जणांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वाेतोपरी प्रयत्न केले जात आहे. विविध उपाययोजनांसह परदेशातून आणि महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे विलगीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ जण परदेशातून आले आहेत. तर मुंबई, पुणे व इतर महानगरातून १ ते २८ मार्चपर्यंत पाच हजार ८४४ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. विदेशातून आलेल्या ३१ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर महानगरातून आलेल्या पाच हजार ८४४ व्यक्तींना घरीच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात १२ जणांना ठेवण्यात आले आहे. तर येथील विलगीकरण कक्षातून पाच जणांना आतापर्यंत सुटी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डात सध्या दोन व्यक्ती दाखल आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्यावतीने कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याअंतर्गत दुचाकीने आता केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. डबलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोशल डिस्टंन्सिंगसाठी ही मोहीम घेण्यात आली आहे. अफवा पसरविणाºयावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना घंटागाडीच्या माध्यमातून सूचना दिल्या जात असून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी माक्स वापरण्याचा सल्ला दिला जात असून माक्स नसलेल्यांनी स्वच्छ रूमाल वापरावा आणि तो गरम पाण्याने धुवावा, असे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर मोहीम राबविली जात आहे.

शहरात निर्जंतुकीकरण
भंडारा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नाल्या, रस्त्यांवर फवारणी केली जात आहे. शनिवारी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वाहनाने शहरातील रस्त्यांवर निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषधीयुक्त पाण्याचा फवारा मारला.

सोशल डिस्टंन्सिंग
भंडारा शहरात रस्त्यावर भाजीबाजार भरत होता. सोशल डिस्टंन्सिंगअंतर्गत त्यांना एका शहरातील मैदानावर बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजीव गांधी चौकातील गणेश विद्यालयात शनिवारी भाजीबाजार भरविण्यात आला होता.

Web Title: The seal of separation on the hands of 5875 persons of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.