बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी अडविला राज्य महामार्ग

By Admin | Updated: September 9, 2016 01:43 IST2016-09-09T01:43:08+5:302016-09-09T01:43:08+5:30

हात दाखवा आणि बस थांबवा व गाव तिथे बस हा एस. टी. महामंडळाने केलेला दावा सोनी या गावात बस येत

School students blocked the Advila State Highway | बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी अडविला राज्य महामार्ग

बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी अडविला राज्य महामार्ग

सोनी येथील घटना : मागणी करूनही परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
लाखांदूर : हात दाखवा आणि बस थांबवा व गाव तिथे बस हा एस. टी. महामंडळाने केलेला दावा सोनी या गावात बस येत नसल्याने व जलद बस थांबत नसल्याने सोनी येथील विद्यार्थ्यांनी वाहतूक अडविल्यामुळे हा दावा फोल ठरला. पवनीच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्यासाठी नकार दिल्याने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलन निवळले.
सध्या एस. टी. महामंडळाने बस वेळापत्रकाचा बेलगाम आदेश काढल्याने सर्वसामन्यासोबत शालेय विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. शाळेच्या वेळेवर बस नाही, बस कदाचित आलीच तर गर्दी असल्या कारणाने नजीकच्या बसस्थानकावर प्रवाशांसाठी थांबत नाही. त्यामुळे सोनी येथील विध्यार्थी व पालकानी तहसीलदार लाखांदूर मार्फत शाखा व्यवस्थापक बस डेपो पवनी यांना निवेदन सादर करून तात्काळ लाखांदूर - वडसा मार्गे बस सुरु करा अन्यथा रस्ता अडवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु शाखा व्यवस्थापक बस डेपो पवनी यांनी तहसीलदार लाखांदूर यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत बस सोडण्यास नकार दिला.
अखेर नाईलाजास्तव आज गुरुवारला सोनी येथील शेकडो विध्याथ्यार्नी सकाळपासूनच लाखांदूर - वडासा मार्ग सोनी बस स्थानकावर अडवून धरला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांची रीघ लागली. हळू हळू पालकांची गर्दी वाढली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पवनीचे आगार व्यवस्थापक यांचेशी भ्रमणध्वनी वरून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलण्यात आले मात्र त्यांनी घटनास्थळी येण्यासाठी नकार दिल्याने लाखांदूरचे पोलीस निरीक्षक देविदास भोयर व तहसीलदार तोडासाम यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्यांनी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परंतु एकदा बस सुरु केल्यानंतर लगेच दोन दिवसात बस बंद करण्यात येत असल्याने वारंवार आंदोलन करणे व निवेदन देणे बरोबर नसल्याचे सांगून निर्णय आत्ताच पाहिजे, म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. अखेर लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: School students blocked the Advila State Highway