शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली, पण विद्यार्थी आलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST

दरवर्षी राजश्री शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने शाळा कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. मात्र शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार गुरूवार २६ जून रोजी शाळा झाल्या. परंतु शाळेत विद्यार्थीच नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली.

ठळक मुद्देशिक्षकांचीच उपस्थिती : कोरोनाच्या सावटात शैक्षणिक सत्राला सुरूवात

राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शाळेचा पहिला दिवस म्हटला की उत्साह आणि उत्सुकता. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग. घंटा वाजताच शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट. मात्र यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु विद्यार्थीच आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधीही अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी.
दरवर्षी राजश्री शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाने शाळा कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. मात्र शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार गुरूवार २६ जून रोजी शाळा झाल्या. परंतु शाळेत विद्यार्थीच नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली. गुरूवारी शिक्षक शाळेत दाखल झाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र होते. पण विद्यार्थी नाही, असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच शिक्षकांना आला.
कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्याचा थेट प्रभाव जनजीवनावर झाला आहे. गुरूवारी सर्वप्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकांच्या उपस्थित सुरू झाल्या. मात्र मुलांची किलबिल ऐकायला मिळाले नाही. आता शाळा सुरू कराव्यात यावर मोठे मंथन झाले. अखेर राज्य शासनाने १५ जून रोजी निर्णय घेतला. शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावे, असे आदेश दिले. शाळेत मुलांना बोलावायचे की नाही याचा अंतिम निर्णय शाळा व्यवस्थापन समितीला दिला. त्यानंतर शिक्षक विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे निर्देश दिले आणि आज विद्यार्थ्याविना शाळा सुरू झाली. शाळांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार अनुभवायला आला. विद्यार्थी गत तीन महिन्यांपासून शाळेत जाण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे शाळांऐवजी घरी बसूनच आॅनलाईन अभ्यास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शाळा बंद शिक्षण सुरू
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू असा ऑनलाईन उपक्रम राज्यस्तरावर राबविला गेला. शाळेत मुले आली नाहीत. मात्र त्यांना डिजिटल शिक्षण, दूरदर्शनच्या वाहिन्यावरून मार्गदर्शन दिक्षा अ‍ॅप आदीद्वारे शिक्षण विद्यार्थ्यांनापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील अनेक शाळा यात सहभागी झाल्या होत्या.

शाळेत आज विद्यार्थ्यांना यायचे नव्हते. किती शिक्षक शाळेत नवीन सत्राच्या दिवशी उपस्थित झाले, याची माहिती घेण्यात येत आहे.
-विनोद चरपे, गटशिक्षणाधिकारी, मोहाडी.

टॅग्स :Schoolशाळा