शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

११४२ पैकी १०१२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM

जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. रुग्णालय क्वारंटाईनमधून आतापर्यंत ६१७ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआयसोलेशन वॉर्डातून २६३ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या आहे. कोरोना विषाणू तपासणीअंतर्गत आतापर्यंत ११४२ व्यक्तींचे घशातील नमूने घेण्यात आले असून त्यापैकी १०१२ व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ आहे.जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये भरती आहेत. रुग्णालय क्वारंटाईनमधून आतापर्यंत ६१७ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात ८५ हजार २६५ नागरिकांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड करीत त्याचा लाभ घेत आहेत. शुक्रवारला आयसोलेशन वॉर्डात १७ व्यक्तींना भरती करण्यात आले. गुरूवारी ८१ व्यक्तींचे घश्यातील स्वाबचा नमूना नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. १२१ जणांचा अहवाल अजुनही अप्राप्त आहे. फ्ल्यु ओपीडीअंतर्गत तीव्र श्वासदाहचे एकूण १३९ व्यक्तींना भरती करण्यात आले असून त्यांचे नमूने पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३६ नमूने निगेटिव्ह असून दोन जणांचा अहवाल अप्राप्त आहे.जिल्ह्यातील नऊ शासकीय वसतीगृहांमध्ये ठेवण्यात आलेल्या मजूर व स्थलांतरीत लोकांची मानसीक तपासणी व समोपदेशन जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांमार्फत केली जात आहे. तसेच त्यांना योगा प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावे याचीही दक्षता घेतली जात आहे.सहा दिवस दुकाने सुरूभंडारा पालिकेचे मुख्याधिकारी यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार भंडारा शहरातील दुकाने आता सहा दिवस उघडी राहणार आहे. मंगळवारी दुकाने बंद राहणार आहे. मात्र आवश्यक वेळी गरजेप्रमाणे नियमात बदल केले जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या