शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजार समितीत शेतमालाची विक्री आता थेट वजनकाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

तुमसर बाजार समितीत तुमसर आणि मोहाडी येथील शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी आणतात. परंतु वेळेवर विक्री होण्याची कोणतीच खात्री नसते. आता तर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दोन महिन्यांपासून बाजार समितीत धान्याची आवक मंदावली आहे. मात्र अचानक दोन दिवसांपासून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आपले धान्य येथे आणणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देकोरोना पार्श्वभूमीवर निर्णय : धान्य राशीच्या पसाऱ्यातून मुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : कोरोनाचे संकट सर्वत्र घोंघावत आहे. विविध ठिकाणी अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनाही शेतमाल विकताना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्णय घेत आता थेट वजनकाट्यावरच शेतमालाची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे धान्याच्या राशी बाजार समितीच्या आवारात दिसणार नाही.
तुमसर बाजार समितीत तुमसर आणि मोहाडी येथील शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी आणतात. परंतु वेळेवर विक्री होण्याची कोणतीच खात्री नसते. आता तर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दोन महिन्यांपासून बाजार समितीत धान्याची आवक मंदावली आहे. मात्र अचानक दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपले धान्य येथे आणणे सुरु केले आहे. कोरोनाचा धसका असताना शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. त्यावर बाजार समिती प्रशासनाने उपाय म्हणून शेतकऱ्यांचे धान्य तात्काळ खरेदी करण्यासाठी उपाययोजना केली आहे. त्यामुळे थेट वजनकाट्यावर धान्य मोजून तेथे खरेदी केले जाणार आहे.
बाजार समितीने यासाठी वजनकाट्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती सभापती भाऊराव तुमसरे, संचालक अरविंद कारेमोरे, अनिल जिभकाटे यांनी दिली आहे. धान्याचा नमुना घेतल्यानंतर धान्य भरलेले वाहन वजनकाट्यावर नेले जाईल. बाजाराच्या आवारात धान्याच्या राशी पसरणार नाही. व्यापारी व शेतकरी या दोघांनाही त्याचा फायदा होईल. इच्छूक शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणताना गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे धान्य तात्काळ विकले जावे यासाठी बाजार समितीने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बाजारातील गर्दीवर आळा बसेल. व्यापारी तसेच शेतकऱ्यांचा खरेदी विक्रीचा वेळ वाचणार आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून येथे धान्याची विक्री करावी. स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये.
-मीनाक्षी वासनिक, प्रभारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर-मोहाडी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी